चालू घडामोडी – 04 मे 2021

केंद्राचे लसधोरण आरोग्यास बाधक

  • केंद्र सरकारचे लसधोरण हे प्रथमदर्शनी जनतेस बाधक असल्याचे दिसत आहे म्हणून त्यात बदल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आलेत.
  • आरोग्य राज्यघटनेच्या कलम २१चा अविभाज्य भाग आहे, याकडे बोट दाखवत केंद्राला लस धोरणात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
  • कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनाबद्दल चाललेल्या सुनावणी दरम्यान महत्वाच्या शिफारशी व निर्देश न्यायालयाने दिले.
  • रुग्णांकडे स्थानिक निवासाचा दाखला व ओळखपत्र नसेल तरीही त्यांना अत्यावश्यक औषधोपचारा पासून दूर ठेवता येणार नाही.
  • रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याबाबत राष्ट्रीय धोरण निश्चित करण्याचे आदेश केंद्राला न्यायालयाने दिले आहेत.

ओडिशाने पत्रकारांना कोविड योध्याचा दर्जा दिला

  • ओडिशा सरकारने पत्रकारांना कोविड योध्यांचा दर्जा दिला आहे.
  • पत्रकार हे अखंड वार्तांकन करत खूप चांगली सेवा देत आहेत व जनतेला कोविडच्या प्रश्नांबद्दल जागरूक करत आहेत म्हणून त्यांची ही मागणी मान्य केल्याचं मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सांगितलं
  • या निर्णयाचा फायदा ६९४४ पत्रकारांना होणार आहे.
  • यासाठी हे पत्रकार गोपाबंधु संबाधिका स्वास्थ्य बीमा योजनेचे लाभार्थी ठरणार आहेत.
  • या योजनेअंतर्गत त्यांना दोन लाख ₹ चा विमा मिळणार आहे.

पुन्हा स्थलांतरितांचा प्रश्न

  • अनलॉक जसा जसा सुरू होत गेला तसे काही महिन्यांपूर्वी मजूर पुन्हा मोठ्या शहरांकडे परतू लागले होते.
  • एप्रिल मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेमुळे व लॉकडाऊन मुळे पुन्हा एकदा हे मजुरांचे लोंढे त्यांच्या स्वतःच्या गावाला परतत आहेत.
  • त्यांच्या जगण्याचा व रोजगाराचा पुन्हा एकदा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.वाढती रुग्णसंख्या, बेड, ऑक्सिजन व औषधांची कमतरता या विचित्र परिस्थितीमध्ये जो वर रेल्वे सुरू आहेत तोवर आपापल्या गावाला पोहोचण्याचा या मजुरांचा प्रयत्न आहे.
  • हातात काम नाही त्यामुळे पैसा नाही पण गावाला पोहोचण्यासाठी जी किंमत मोजावी लागत आहे ती ही अधिकच आहे.
  • या सर्व परिस्थितीमुळे त्यांचे यावर्षीही खूप हाल होत आहेत. आणि स्थलांतरित मजुरांचा प्रश्न तसाच आहे त्यावर मार्ग काढला जात नाही.

पाच राज्यांच्या निवडणुका

  • बंगाल विधानसभा निवडणूक २०२१:
  • प. बंगाल विद्यमान मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा एकहाती विजय.
  • तृणमूल काँग्रेसला तब्बल २१५ जागांवर विजय मिळवत प्रचंड बहुमत.
  • भाजपाला ७६ जागा मिळाल्या.
  • तरीही नंदीग्राम मतदार संघातून बॅनर्जी यांचा पराभव, माजी सहकारी सुवेन्दू अधिकारी यांनी पराभूत.
  • काँग्रेस व डावे पक्ष यांना शून्य जागा.
  • बंगालमध्ये विधानपरिषद नसल्यामुळे बॅनर्जी यांना येत्या सहा महिन्यांत पुन्हा एकदा निवडून यावे लागणार.

आसाम विधानसभा निवडणूक २०२१:

  • भाजप प्रणित आघाडीला स्पष्ट बहुमत.
  • दुसऱ्यांदा भाजप , आसाम गण परिषद व युनायटेड पीपल्स पार्टी लिबरल यांच्यासह सरकार स्थापन करणार.
  • एकूण जागा १२६ पैकी भाजप आघाडीला ७४ जागा,
  • तर काँग्रेस आघाडीला ५० जागा.
  • सर्वानंद सोनोवाल किंवा हेमंत बिस्वशर्मा मुख्यमंत्री होतील

तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२१:

  • द्रविड मुंनेत्र कळ्ळघम् (डीएमके) १० वर्षांनी सत्तेत.
  • एआयएडीएमके/अण्णाद्रमुक चा पराभव झाला.
  • डीएमके ला १३५ जागा तर एआयडीएमके ला ७० जागांवर समाधान मानावे लागले.
  • एम्.के. स्टॅलिन हे नवे मुख्यमंत्री होतील.

केरळ विधानसभा निवडणूक २०२१:

  • डाव्या लोकशाही आघाडीचा (एलडीएफ) ऐतिहासिक विजय.
  • दुसऱ्यांदा सत्ता मिळत नाही अशी चार दशकांची परंपरा असणाऱ्या केरळमध्ये पी. विजयन् पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार.
  • एलडीएफ ला १४० पैकी ७९ जागा मिळाल्या तर युडीएफ (काँग्रेसप्रणित आघाडी) ला ३६ जागा.
  • मेट्रोमॅन इ. श्रीधरन पराभूत.

पुद्दुचेरी विधानसभा निवडणूक २०२१:

  • केंद्रशासित प्रदेश, एकूण ३० जागा.
  • एन.आर.काँग्रेस ला १० जागा तर भाजपला ६ जागा, काँग्रेसला २ जागा तर द्रमुक ला ६ जागा.
  • सुरक्षेचा तामझाम, गाड्यांचा ताफा, लोकांची गर्दी याला महत्व न देता सहज जनतेसाठी उपलब्ध होणे अशी खासियत असलेले एन.रंगास्वामी हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री.
  • म्हणून ते लोकांचे मुख्यमंत्री म्हणून प्रसिद्ध आहेत.

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole