04 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

ज्येष्ठ अभिनेते लीलाधर कांबळी यांचे निधन

  • विनोदी अभिनेता अशी स्वतंत्र ओळख निर्माण करणारे ज्येष्ठ कलाकार लीलाधर कांबळी यांचे 83 व्या वर्षी कर्करोगाने निधन झाले.
  • मूळचे मालवण मधील असणाऱ्या लीलाधर यांनी मुंबईतल्या मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी करत रंगभूमीवर कामस सुरवात केली. त्यांनी तीस पेक्षा अधिक नाटकांमधून विविध भूमिका साकारल्या आहेत.

देशात खासगी रेल्वेसेवा 2023 पासून

  • देशातील 109 मार्गांवर रेल्वेसेवा खासगी कंपन्याकडे देण्यासाठी प्रयत्न चालू झाले असून याचा प्रस्ताव कार्यान्वित झाला आहे. खासगी रेल्वेसेवा 2023 मध्ये प्रत्यक्षात येईल.
  • 30 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असलेल्या या प्रकल्पसाठी रेल्वेने 109 मार्गांसाठी 151 गाड्यांच्या व्यवस्थापणसाठी कंपन्यांकडून प्रस्ताव मागितले आहेत. यामध्ये भारतीय कंपन्यांना संधी देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

खासगी सेवा का ?

  • खासगी कंपन्यांना व्यवस्थापन सुपूर्त केल्याने नवनवीन तंत्रज्ञान मिळेल तर सोबतच जागतिक दर्जाच्या सेवा सुद्धा मिळतील. यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेवर अधिक लक्ष केंद्रित करणे रेल्वेला शक्य होईल.

चालू खाते 13 वर्षात प्रथमच शिलकीत

  • आंतरराष्ट्रीय बाजारात पडलेल्या तेलाच्या किमती भारताच्या पथ्यावर पडल्या आहेत. 13 वर्षात प्रथमच भारताच्या चालू खात्यावरील तूट (Current Account Deficit) संपुष्टात येऊन किंचित आधिक्य दिसून आली आहे.
  • भारतीय रिझर्व्ह बँकेने याबाबत अहवाल जाहीर केला आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये चौथ्या तिमाहीत चालू खात्यावर 0.6 अब्ज डॉलरची शिल्लक आहे. तर मागील वर्षी भारताच्या चालू खात्यावर 4.6 अब्ज डॉलरची तूट होती.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole