चालू घडामोडी – 03 मे 2021

स्पुटनिक व्ही लस भारतात

  • रशियाची बहुप्रतिक्षित लस ‘स्पुटनिक व्ही’ ही १ मे ला भारतात.
  • जवळपास दीड लाख डोस हैद्राबादमध्ये दाखल झाले आहेत.
  • कोव्हिशील्ड, कोवॅक्सिन नंतर उपलब्ध होणारी तिसरी तर दुसरी परदेशी लस आहे.
  • स्पुटनिक ही लस ९१.६% प्रभावी असल्याचं चाचण्यांमध्ये आढळून आलं आहे.

आपत्कालीन वापरासाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी

  • या लसींना जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन वापरासाठी मॉडर्नाला परवानगी दिली आहे.
  • WHO कडून परवानगी मिळालेल्या लसी
  • मॉडर्ना (एम् आरएनए वॅक्सिंन)
  • फायझर
  • अस्ट्रा झेनेका
  • जॉन्सन अँड जॉन्सन

मुख्य निवडणूक आयुक्त मद्रास उच्च न्यायालयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात

  • भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त मद्रास उच्च न्यायालयाच्या टिप्पण्यांवरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल झाले आहेत.
  • मद्रास उच्च न्यायालयाने मीडियाच्या रिपोर्ट्स च्या आधारे निवडणूक आयोगाविरोधात सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत सांगितलं.
  • कारण निवडणूक आयोगाच्या कारभारामुळे देशात कोरोना पसरला आहे. म्हणून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली आहे.
  • या याचिकेत अशी मागणी करण्यात आली आहे की, मद्रास उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांच्या या वार्तांकन पद्धतीवर पायबंद घालावा.
  • कोणताही सबळ पुरावा नसताना असे आरोप करणे योग्य नाही.
  • निवडणूक आयोग ही सुद्धा देशातील एक स्वायत्त संस्था आहे, जर पुराव्याविनाच जर असे आरोप होत राहिले तर लोकांचा या संस्थेवरचा विश्वास उडून जाईल.

कलम ३११ चा वापर करून शिक्षकाला कामावरून कमी केले.

  • जम्मूकाश्मीर मध्ये एका सरकारी नोकरीतील शिक्षकाला त्याच्या आरोपांची चौकशी न करताच कामावरून काढण्यात आले.
  • इदरीस जान या शिक्षकाच्या प्रकरणात कलम ३११ उपकलम (२) व पोटकलम (क) नुसार हा मुद्दा राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत असल्यामुळे नायब राज्यपाल महोदयांना इथे चौकशी करण्याची आवश्यकता वाटली नाही.
  • इदरीस जान, क्रालपोरा कुपवाडा मधल्या माध्यमिक शाळेत शिक्षक आहे व पोलीस तपासानुसार तो फुटीरतावादी ‘तहरिकएहुर्रियत’ या संघटनेचा समर्थक आहे.

पी ८आय विमाने सहा विमाने अमेरिका भारताला देणार

  • अमेरिकेने भारताबरोबर २.४२ बिलियन डॉलर्सचा करार केला आहे ज्या द्वारे भारताला अमेरिकेकडून पी ८ आय विमाने मिळणार आहेत.
  • ही पी ८ आय विमाने भारतीय नौसेनेसाठी खरेदी करण्यात आलेली आहेत.
  • या विमानांच्या वापरामुळे सागरी सीमा सुरक्षा करण्यास मदत होणार आहे, मुख्य टेहळणीचं काम ही विमाने करत आहेत.
  • ही विमाने प्रसिद्ध बोईंग ७३७ या विमानाच्या धरतीवर बनवण्यात आली आहेत. भारत हा त्याचा पहिला ग्राहक असणार आहे.
  • याच बरोबर अमेरिका भारताला मिसाईल वॉर्निंग सेन्सर्स, रेडिओ सिस्टिम्स, टॅक्टिकल ओपन मिशन सॉफ्टवेअर्स अशी अजून बरीच अन्य उपकरणेही देणार आहे.
  • अमेरिकेसोबत भारताने कम्युनिकेशन्स अँड कॉम्पॅटिबिलिटी सेक्युरिटी अग्रीमेंट हा करार केला आहे, त्या कराराप्रमाणे ही विमाने मिळत आहेत.

शास्त्रज्ञ दीपक वीरप्पन यांचे सापाला नाव दिले गेले.

  • सरीसृप व उभयचर प्राणिसंपदेचे अभ्यासक दीपक वीरप्पन यांचे नाव एका सापाच्या प्रजातीला देण्यात आले आहे.
  • वूड स्नेक असं सामान्य इंग्रजी नाव असणारा हा साप आहे. या क्षेत्रातील वीरप्पन यांचे योगदान म्हणून या सापाला ‘झायलॉफिस दिपकी’ असं नाव देण्यात आलं आहे.
  • हा साप धोकादायक नसतो. पश्चिम घाटातील विपुल जैवसंपदेचाच घटक आहे. हा कायम शेतातील मृदा खणताना आढळून येतो.
  • अगस्त्यमलाई पर्वतरांगांमध्ये सखल भागात, कोरड्या क्षेत्रांमध्ये या सापाचा वावर असतो.
  • तर झायलोफिस जातीचे अन्य साप हे समुद्रसपाटीपासून १७०० मीटर उंचीवर अन्नमलाई व निलगिरी पर्वतरांगांत आढळतात.
  • आधी माहिती असणारया झायलॉफिस कॅप्टई या प्रजातीशी याचे साधर्म्य आहे.
  • ही तामिळनाडूच्या कन्याकुमारी भागामध्येच जास्तकरून आढळणारी प्रजाती आहे.

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole