चालू घडामोडी – 3 जून 2021

सिरममध्ये कोव्होवॅक्सची प्रायोगिक निर्मिती

  • कोव्होवॅक्स या नवीन लशीचे उत्पादन चाचणी स्तरावर सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाने (Serum Institute of India) सुरू केले आहे. ही लस प्रथिनांवर आधारित आहे.
  • या लसीला आपत्कालीन मान्यता मिळवण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे.
  • अमेरिकेने संरक्षण उत्पादन कायदा लागू करून लशीला लागणारे घटक निर्यात करण्यावर निर्बंध लागू केल्याने ही लस तयार करण्यास अडचण येत होती.
  • कोव्होवॅक्स ही नोव्होवॅक्सची प्रगत आवृत्ती आहे. पण त्याला देशात अजून मान्यता मिळाली नाही.
  • नोव्होवॅक्सच्या चाचण्या ब्रिटनमध्ये यशस्वी झाल्या असून त्याची कोरोना विषाणू विरोधात ९६.४% परिणामकारकता दिसून आली.
  • बी १.१.७ विषाणू स्ट्रेन विरोधात या लसीची परिणामकारकता ८६.३% आहे. बी १.१.७ हा प्रकार प्रथम ब्रिटनमध्येच सापडला होता.
  • या लशीची क्षमता दक्षिण आफ्रिकेत घेतल्या चाचण्यांमधून बी १.३५१ विरोधात ५५.४% इतकी आहे. ही लस सुधारित आहे असं तज्ज्ञ सांगतात.

पेटंट माफीच्या प्रस्तावावर भारताची चर्चेची मागणी

  • जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांनी कोरोना लशींचे पेटंट माफ करावे यासाठी मांडलेल्या प्रस्तावावर चर्चा सुरू करण्याची मागणी भारताने केली आहे. व जे मुद्दे प्रस्तावात मांडले आहेत, त्याच्या आधारवरच चर्चा होईल अशी अपेक्षा केली आहे.
  • भारताने बौद्धिक संपदा हक्कांविषयीचा व्यापार विषयक दृष्टिकोन करार (TRIPS) च्या अनौपचारिक बैठकीत हे निवेदन सादर केले आहे. त्यात पेटंट माफ करण्यासाठीचे मार्ग व पुढील दिशा यानावर चर्चा करण्यात असं म्हणलं होतं.
  • भारत, द. आफ्रिका, इंडोनेशिया यांनी लशींना पेटंट माफी देण्याची मागणी केली आहे. व याला एकूण ६२ देश प्रायोजक आहेत.
  • ऑक्टोबर २०२० मध्ये पहिल्यांदा हा प्रस्ताव मांडण्यात आला. तेंव्हा असे म्हणले होते की या करारातील काही तरतूदी माफ करण्यात याव्यात. त्यामुळे कोविद वरचे उपचार सोपे होतील.
  • TRIPS १९९५ पासून अंमलात आलेला आहे. व हा बहुराष्ट्रीय बौद्धिक संपदा करार आहे.

भारतातील विषाणूंचे कॅपा, डेल्टा हे नामकरण करण्यात आले.

  • भारतात सापडलेल्या बी.१.६१७.१ व बी.१.६१७.२ या विषाणूंचे नामकरण कॅपा आणि डेल्टा असे करण्यात आले आहे.
  • जागतिक आरोग्य संघटनेने नामकरण केले असून त्यांना ग्रीक वर्णाक्षरांची नावे देण्यात आली आहेत.
  • विषाणूंवरील चर्चा करताना सोपेपणा यावा, यासाठी हे नामकरण करण्यात आले व भारतीय विषाणू असे संबोधले जात सबंधित देशावर एक नकारात्मक शिक्का बसतो.  बी.१.६१७. ला भारतीय उपप्रकार संबोधण्यात आले होते.
  • बी.१.१.७ हा विषाणू ब्रिटनमध्ये सापडला होता, त्याला आता अल्फा हे नाव देण्यात आले.
  • बी.१.३५१ या दक्षिण आफ्रिकेतील प्रकाराला बीटा, तर पी.१ या ब्राझिल उपप्रकाराला झेटा, तर अमेरिकेत सापडेलल्या प्रकारांना एप्सिलॉन आणि आयोटा अशी नाव देण्यात आली आहेत.

चित्यांचे भारतात पुन्हा दर्शन

  • जगातील सर्वात सस्तन वेगवान प्राणी अशी ज्याची ओळख असते, अशा चित्याची पाऊले पुन्हा भारतात पडणार आहेत.
  • देशातून ७४ वर्षांपूर्वी लुप्त झालेल्या प्राण्यांमध्ये चित्याचा समावेश करण्यात आला होता.
  • प्रथमच मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्यांचा वावर असणार आहे. नोव्हेंबर महिन्यांत १० चित्ते दक्षिण आफ्रिकेतून मागवले जाणार आहेत.
  • पाच नर व पाच मादी चित्यांसाठी कुनो राष्ट्रीय उद्यानात (Kuno national park) विशेष विभाग बनवला जाणार आहे.
  • १९४७ मध्ये मध्यप्रदेशातील कोरिया भागात चित्ता शेवटचा आढळला होता. आता हे ठिकाण छत्तीसगड मध्ये आहे. १९५२ मध्ये चित्ता भारतातून नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते.
  • कुनो राष्ट्रीय उद्यान सुमारे ७५० चौ.किमी इतक्या क्षेत्रात पसरले आहे. चित्यांच्या अधिवासासाठी हे सुयोग्य ठिकाण आहे.
  • चित्यांसाठी मुबलक भक्ष उपलब्ध आहे. या जंगलात हरणे, चिंकारा, नीलगाय, सांबर व चितळ यांची संख्या मोठी आहे.

‘ब्रिक्स’ गट भारताच्या पाठीशी

  • ब्रिक्स (BRICS) गटातील देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत चीनी परराष्ट्र मंत्री वॅंग यी यांनी ब्रिक्स मधील सर्व देश भारताच्या (India) च्या पाठीशी असतील असं सांगितलं आहे.
  • कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली नवी वैश्विक आव्हाने, बहू ध्रुवीय व्यवस्थेची असलेली आवश्यकता, दहशतवाद यांसारख्या महत्वाच्या मुड्ड्यांवर चर्चा झाली.
  • ब्राझिल, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका यांच्या परराष्ट्र मंत्र्यांची विडियो कॉन्फ्रेंसिंगद्वारे बैठक होती, व या बैठकीचे अध्यक्षपद एस. जयशंकर यांनी भूषवले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole