03 July 2020 Current Affairs In Marathi (Chalu Ghadamodi) । चालू घडामोडी

बचतगट आता ऑनलाइन

  • करोनाचा फटका प्रत्येकाला बसला आहे यामध्ये बचतगट सुद्धा अपवाद नाहीत पण यामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या रोजगारावर परिणाम झाला आहे.
  • यावर उपाय म्हणून बचतगट अमेझॉन आणि GEM या ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध असणार आहे. यामुळे बचतगटांना व्यवसाय आणि ग्राहकांना वस्तू मिळने सुलभ होणार आहे.

राज्यातील बचतगट

  • ग्रामीण भागातील गरीब कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण करून त्यांचे जीवनमान उंचवण्याच्या हेतूने ‘राज्य ग्रामीण जीवनोती अभियान’ अंतर्गत राज्यात 4.62 लाख बचतगट स्थापन केले आहेत. यामुळे अनेक कुटुंबाना आपल्या उपजीविकेचे 2 पेक्षा अधिक स्रोत विकसित करता आले आहेत.

ई किसानधन अँप

  • देशभरातील शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाइलवर कृषी आणि बँकेची सुविधा देण्यासाठी HDFC बँकेतर्फे या अँपची निर्मिती करण्यात आली आहे.
  • हे अँप शेतीविषयक वृत्त, हवामान, बियाणांच्या वाणांची माहिती, सल्लागार, ई पशुहाट आणि किसन टीव्ही अश्या मूल्यवर्धित सेवा देता येतील.
  • या अँप वरून शेतकऱ्यांना बँक खाते सुरू करणे, हवामान सुविधांचा लाभ घेणे, KYC कागदपत्रे पूर्तता करणे अश्या सेवांचासुद्धा लाभ घेता येईल.

जागतिक बँकेचे भारताला विक्रमी कर्ज

  • जागतिक बँकेने गेल्या वर्षभरात सर्वाधिक कर्ज रक्कम भारताला उपल्बध करून दिली आहे आणि त्यातील 50 टक्के रक्कम कोरोना संकट तिमाहीत दिली गेली आहे.
  • आरोग्य यंत्रानेसोबतच या कर्जाचा सर्वाधिक फायदा देशातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाला झाला आहे.
  • जागतिक बँकने ( World Bank ) भारताला एकूण 5.13 अब्ज डॉलरचा कर्जपुरवठा केला आहे. भारताला कर्ज स्वरूपात देण्यात आलेली ही रक्कम गेल्या दशकातील विक्रमी आहे.

आजची Current Affairs QUIZ सोडवली का ? इथे क्लिक करून सोडावा

1 Comment
  1. Vitthal teli says

    Taday was so Hard test

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole