चालू घडामोडी – 01 मे 2021

कोरोना बधितांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण

  • राज्यातील कोरोना बधितांच्या नमुन्यांचे तीन महिने जनुकीय क्रमनिर्धारण करण्याचा राज्यशासनाने निर्णय घेतला आहे.
  • इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स अँड इंटेग्रेटीव्ह बायोलॉजी, दिल्ली (आयजीआयबी) यांच्याशी सामंजस्य करार करून दर आठवड्याला प्रत्येक जिल्ह्यातील २५ नमुने याप्रमाणे परीक्षण करण्यात येईल.
  • कोरोनाच्या उत्परिवर्तनाचा अभ्यास हा तीन फेऱ्यांमध्ये होणार आहे. प्रत्येक फेरीसाठी १ महिना असे तीन महिने इतका कालावधी स्पष्ट करण्यात आला आहे.
  • यवतमाळ, अमरावती येथील कोरोनाबधितांचे नमुने पुण्याच्या बी.जे.मेडिकल मध्ये तपासले असता ते उपरिवर्तीत (म्युटेट) झालेले आढळले.
  • जनुकीय क्रमनिर्धारण म्हणजे जनुकसंचातील सर्व ‘डीएनएचा’ क्रमवार अभ्यास. याचा उपयोग नव्या विषाणूची ओळख पटवण्यासाठी केला जातो.
  • राज्यात अचानक कोरोना संसर्ग कसा वाढला, याची कारणं या जनुकीय क्रमनिर्धारणावरून कळू शकतील.

राज्यभरात रेमेडिसिव्हिर चे रुग्नांनावर दुष्परिणाम

  • पुणे,पालघर रायगड यासारख्या शहरांतून रेमेडिसिव्हिरच्या दुष्परिणाम झालेल्या तक्रारी आल्या आहेत.
  • रेमेडिसिव्हिरचा पुरवठा सध्या थांबवण्यात आला असून अन्न व औषध विभागाकडून स्पष्टीकरण मागवण्यात येत आहे.
  • हेटेरो हेल्थकेअर कंपनीच्या रेमेडिसिव्हिरचा डोस घेतला तर रुग्णाला शरीराला कंप सुटतो, अशी तक्रार करण्यात आली आहे.
  • या इंजेक्शनचा वापर रोखण्यात आल्याचं सांगितलं आहे.

चार हजार कोटींचा निधी महाराष्ट्र सरकार कर्ज रोखे विकून उभा करणार

  • कोरोना नियंत्रण व लसीकरणासाठी साडे सहा हजार कोटींची तरतूद केल्यामुळे महसूल कोंडी झालेल्या राज्य शासनाने आता कर्जरोखे विकून चार हजार कोटींचा निधी उभारण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.
  • कोरोना लाटेने यावर्षी आर्थिक नियोजन कोलमडले. अर्थमंत्र्यांनी १०२२६ कोटी ₹ तूटीचा अर्थसंकल्प सादर केला होता.
  • २०२१२२ च्या आर्थिक वर्षात ३ लाख ६८ हजार ९८७ कोटी ₹ जमा होतील व १०२२६ कोटी ₹ ची तूट येईल असा अंदाज होता.
  • गेल्या वर्षी टाळेबंदी लागल्यामुळे सात हजार कोटींचा निधी हा कर्जरोख्यांतून उभा केला होता.

कोरोनावर परिणामकारक औषध – आयुष ६४

  • सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स (सीसीआरएएस) या संस्थेने विकसित केले ‘आयुष ६४’ हे औषध परिणामकारक असल्याचे वैद्यकीय चाचण्यातून दिसून आले आहे.
  • सीसीआरएएस ही संस्था आयुष मंत्रालयाच्या अखत्यारीत येते.
  • आयुष मंत्रालय, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांनी संयुक्तपणे आयुष ६४ च्या शास्त्रीय पद्धतीने वैद्यकीय चाचण्या, सुरक्षितता व परिणामकारकता तपासली आहे.
  • लक्षणे नसलेल्या, सौम्य आणि मध्यम लक्षणे असणाऱ्या रुग्णांना याचा जास्त फायदा होत आहे असं आढळून आलं आहे.
  • १९८० मध्ये मलेरिया साठी विकसित केलेले हे औषध आता कोरोनवरही गुणकारी ठरत आहे.
  • या औषधामध्ये काडेचिराईत, सप्तपर्णा, कुटकी सागरगोटा यासारख्या वनस्पतींचा समावेध करण्यात आला आहे.

ड्राय स्वॅब तंत्रज्ञान : कोरोना संसर्गाची चाचणी

  • कोरोना संसर्गाची खात्री करून घेण्यासाठी RTPCR चाचणी करून घ्यावी लागते. याचा अहवाल यायला २४ तास लागतात. व खर्च ५००१५०० ₹ इतका आहे.
  • साधारणपणे नाकातील व घशातील द्रवाचा नमुना प्रयोगशाळेत गेल्यावर त्यातून ‘आरएनए’ वेगळा काढणे; एक्सट्रॅक्शन करणे व तो कोरोनाचा असल्यास संसर्ग झाला आहे असा निष्कर्ष काढण्यात येतो, सुसज्ज प्रयोगशाळेतही याला चार तासांचा वेळ लागतो.
  • हा वेळ व खर्च अर्ध्यावर आणणारं तंत्रज्ञान ‘ड्राय स्वॅब’ हैद्राबाद संशोधकांनी विकसित केलं आहे.
  • सेन्टर फॉर सेल्ल्यूलर व मोलेक्युलर बायोलॉजि म्हणजे सीसीएमबी व वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर) यांनी एकत्र येऊन हे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  • यांत आरएनए एक्सट्रॅक्शन ही प्रक्रिया न करता ही ‘ड्राय स्वॅब’च्या मदतीनेही कोरोनाची लागण झाली आहे की नाही हे कळून येते.

लेखकनाटककार शेखर ताम्हाणे यांचे निधन

  • वय ६८, लेखकनाटककार
  • सविता दामोदर परांजपे या नाटकाचे लेखन व निर्मिती, ‘तू फक्त हो म्हण’ हे ही गाजलेले नाटक, अलीकडेच प्रदर्शित झालेले ‘तिन्ही सांज’.
  • जेष्ठ अभिनेत्री व गायिका फैय्याज यांची भूमिका असलेली
  • ‘वादळवारं’ ‘तुला यावंच लागेल’ सारखी नाटकं त्यांनी केली.
  • एकांकिका लेखन हे त्यांचं वैशिष्ट्य, ‘कलकी’, ‘रॉन्ग नंबर’, ‘मिसिंग’ यासारख्या बऱ्याच एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत.
  • ‘अल्ट्राटेक’ या पर्यावरणविषयक सेवा व सल्ला देणारी संस्था सुदधा त्यांनी स्थापन केली.
  • सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग होता.
  • कोरोना काळात मराठी नाटक समूहाने रंगमंच कामगारांसाठी निधी गोळा करण्यातही त्यांचा पुढाकार होता

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole