चालू घडामोडी – 1 जून 2021

तापमानवाढीमुळे चक्रीवादळे

  • हवामान बदल, समुद्राचे वाढते तापमान, हवेतील धूलिकण (एरोसोल), बाष्पीकरण, गुप्त उष्णता यांमुळे पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्रात ही चक्रीवादळे (Cyclones) निर्माण झाली आहेत.
  • गेल्या चार वर्षांपासून सतत पश्चिम किनारी भागांत या चक्रीवादळांचा फटका बसतो आहे.
  • एप्रिल ते जून या मान्सूनपूर्व काळ असतो. याच काळात चक्रीवादळे तयार होतात.
  • १९८० नंतर पहिल्यांदाच २०१८ ते २०२१ याकाळात चक्रीवादळे तयार होत आहेत. ही तीव्र ते अतितीव्र अशा स्वरूपात बदलतात.
  • अरबी समुद्र व हिंदी महासागराचे तापमान हे बंगालच्या उपसागरापेक्षा तुलनेने वाढले आहे.
  • चक्रीवादळाच्या निर्मितीसाठी २७.५℃ इतकं तापमान असणं गरजेचं असतं. सध्या हे तापमान २७℃ अंशावरून ३१℃ पर्यंत नोंदवले गेले आहे.गेल्या चार दशकांमध्ये अरबी समुद्राचे तापमान १.४℃ ने वाढले.
  • अरबी समुद्रातील चक्रीवादळे: २०१८- सागर व मेकुनू, २०१९- वायू, २०२०- निसर्ग, २०२१- तौक्ते.

जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन

  • ३१ मे = जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन (World No Tobacco Day)
  • हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या तर्फे साजरा केला जातो. 
  • हा दिवस जगातील ११ अधिकृत जनारोग्य मोहिमांपैकी १ आहे.
  • १९८७ मध्ये पहिल्यांदा जागतिक तंबाखूविरोधी दिन साजरा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक आरोग्य सभेने पहिल्यांदा ठराव पास केला.
  • पण त्या वर्षी ७ एप्रिलला हा दिवस साजरा केला गेला.
  • त्यानंतर १९८८ पासून ३१ मे हा दिवस जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.
  • २०२१ ची जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिनाची संकल्पना ‘तंबाखू सोडण्यासाठी वचनबद्ध व्हा’ (Commit to quit) ही आहे.

 आशियाई बॉक्सिंग स्पर्धा २०२१.

  • महिला बॉक्सिंगपटू पूजा राणी हिने सलग दुसरे सुवर्णपदक पटकावले.
  • महिलांच्या ७५ किलो गटात उझबेकिस्तान च्या मावलुडा मेलेनोव्हा चा पराभव केला.
  • २०१९ मध्येही तिने या गटात सुवर्णपदक पटकावले होते.
  • यावर्षी ती सुवर्णपदक जिंकणारी एकमेव भारतीय महिला ठरली आहे.
  • जगजेत्ती एम्.सी. मेरीकोम, लालबुतसाही व अनुपमा यांचा अंतिम फेरीत पराभव झाल्यामुळे त्यांना रौप्यपदक मिळाले.

केंद्राने ईसीएलजीएसची व्याप्ती वाढवली.

  • इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम (ECLGS) या योजनेची व्याप्ती केंद्र सरकारने कोरोना जागतिक साथीची परस्थिती बघून वाढवली आहे.
  • ३० सप्टेंबर पर्यंत किंवा ३ लाख कोटी ₹ चे कर्ज वाटप होईपर्यंत या योजनेचा कालावधी असणार आहे.
  • याचा व्यक्तीला व सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना होणार आहे.३१ डिसेंबर २०२१ पर्यंत कर्ज वाटप करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • रुग्णालये, नर्सिंग होम, क्लिनिक यांना ऑनसाईट ऑक्सिजन जनरेशन प्लांट उभारण्यासाठी देण्यात येणाऱ्या दोन कोटी ₹पर्यंत  च्या कर्जांना ‘एनसीजीटीसी’ कडून १००% हमी संरक्षणाचा समावेश असेल.
  • लस उत्पादक, रुग्णालये/डिस्पेनसरीज्, पॅथॉलॉजी लॅब, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स चे उत्पादक व पुरवठादार, लशींचे आयातदार, कोविडच्या औषधांची वाहतूक करणाऱ्या कंपन्या, यांच्यासाठीच्या योजना:
  • आरोग्य सेवा क्षेत्रातील व्यवसायांसाठी कर्ज- ईसीएलजीएस अंतर्गत ऑक्सिजन प्लँट उभारणीसाठी कर्ज, रुग्णालये, नर्सिंग होम यांना ऑक्सिजन प्लँट उभारणीसाठी २ कोटी ₹ पर्यंत ७.५% दराने कर्ज. या कर्जाला ‘एनसीजीटीसी’ कडून १००% संरक्षणाची हमी असेल.
  • आरोग्यसेवा उत्पादकांना आणि आरोग्यसेवेसाठी पायाभूत सोयीसुविधा उभारण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी कर्ज.
  • कोविड उपचारांसाठी पगारदार किंवा पगारदार नसणाऱ्या, पेन्शनर व्यक्तींना २५ हजार – १ लाख ₹ पर्यंतचे असुरक्षित कर्ज. सार्वजनिक क्षेत्रातील बँकावरील सर्व योजना सवलतीच्या व्याजदरांमध्ये उपलब्ध करून देणार. 


जुन्या गोव्यात तरंगते धक्के बांधण्यास परवानगी

  • भारत सरकारने जुन्या गोव्यामध्ये तरंगते पक्के धक्के बांधण्यासाठी परवानगी दिलेली आहे.
  • हे धक्के मांडवी नदीमध्ये बांधले जाणार आहेत. हा मांडवी नदीमध्ये बांधला जाणारा दुसरा धक्का आहे.
  • यामुळे जुने गोवे व पणजी जलमार्गाने जोडले जातील.
  • मांडवी नदीचा राष्ट्रीय जल मार्ग क्रमांक ६८ आहे.
  • मागच्या वर्षी कॅप्टन ऑफ पोर्ट्स, पणजी येथे २१ फेब्रुवारी २०२० ला केंद्रीय जहाजबांधणी, बंदरे व जलमार्ग मंत्री नितीन गडकरी आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावन्त यांनी पहिल्या धक्क्याचे उद्घाटन केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole