MPSC परीक्षांचे नवीन वेळापत्रक जाहीर
कोरोना महामारीमुळे तब्बल २ वेळा पुढे ढकलल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षांचे नवीन वेळापत्रक आज दिनांक ११ जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आले आहे. (New MPSC Exam Time Table) MPSC परीक्षांचे नवीन वेळापत्रक खालील प्रमाणे –
११ ऑक्टोबर २०२० ला असणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० आता नवीन वेळापत्रकानुसार १४ मार्च २०२१ ला पार पडणार, ०१ नोव्हेंबर २०२० ला असणारी अभियांत्रिकी पूर्व परीक्षा २७ मार्च २०२१ ला होईल तसेच २२ नोव्हेंबर २०२० ला होणारी संयुक्त पूर्व परीक्षा आता नवीन वेळापत्रकानुसार ११ एप्रिल २०२१ ला होणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.