फळे व भाज्या खाऊन घटवलं तब्बल 31 किलो वजन, संध्याकाळी 6 नंतर या कामापासून राहतात चार हात लांब..!

Weight loss tips in marathi – वाढत्या वजनाची समस्या प्रत्येकालाच भेडसावते. सुरुवातीला कपडे घट्ट होतात, मग आपण त्यात मावेनासे होतो. एक काळ असा येतो की वजनाने भला मोठा आकडा गाठलेला असतो आणि मग आपल्या डोक्यात घंटा वाजू लागते की वजन कमी करायला हवे.

वजन कमी करणे हे केवळ शारिरीक दिसण्यापुरते मर्यादित नसते तर वाढत्या वजनाचे आरोग्यासाठी धोक्याचा इशारा असतो. लठ्ठपणामुळे केवळ आकारमान वाढते असे नाही तर अनेक आजार शरीरात घर करतात. साहाजिकच आरोग्य निरायम राहात नाही.

वजन कमी करण्यासाठी विविध गोष्टी कराव्या लागतात हे जरी खरे असले तरीही क्रॅश डाएट, विविध पावडरी यांपेक्षा व्यायाम आणि आहार नियंत्रण या गोष्टींनी नैसर्गिक मार्गाने वजन कमी करता येऊ शकते. वजन कमी करण्याच्या मार्गात फक्त व्यायाम किंवा फक्त आहार नियंत्रण उपयोगी नाही तर दोन्हींची योग्य सांगड घालावी लागते.

आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश जास्त प्रमाणात करून त्याला योग्य व्यायामाची जोड देऊन वजन कमी करता येऊ शकते. बिहारमधील विजयकुमार नावाच्या एका वकिलांनी असेच आहार नियंत्रण आणि व्यायाम याआधारे आपलं ३१ किलो वजन कमी केलं आहे.

वाढत्या वजनामुळे अनेक आजार शरीरात घर करू लागतात. मग शारिरीक त्रासांना सुरूवात होते. याची सूचना आपल्याला मिळतात पण त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वाढत्या वजनामुळे गुडघेदुखी, दम लागणे आदी त्रास होतात, यामुळे जिने चढणेच काय साधे चालणेही अशक्य होते. हा इशारा असतो तेव्हाच वजन आटोक्यात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजे. विजयकुमार यांनाही अशीच लक्षणे दिसू लागल्यानंतर त्यांनी वजन कमी करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न केले.

या प्रयत्नांमध्ये आहारात फळे, भाज्या यांचा अधिक समावेश केला होता. संध्याकाळी ६ नंतर मात्र काहीही खायचे नाही असे त्यांनी ठरवले होते. व्यायामाआधी ग्रीन टी, व्यायामनंतर प्रोटिन शेक यांचा समावेश केला. आहारात सलाड, डाळ, भात, हिरव्या भाज्या आणि आठवड्यातून दोन तीन वेळा भाजी ऐवजी चिकन किंवा अंड करी घेत असत. आहाराला त्यांनी नियमित व्यायामाची जोड दिली होती.

काही गोष्टी त्यांनी दिनचर्येत समाविष्ट केल्या. त्या जाणून घेऊया.

व्यायाम

आठवड्यातला एक दिवस बहुतांश वेळा सुट्टीचा वार किंवा रविवार सोडून सहा दिवस नियमित व्यायाम केला, त्यात योगा, झुंबा, सायकलिंग यांचा समावेश केला होता. व्यायामाला जोड दिली ती योग्य आहाराची, आहाराच्या काही सवयींची, आरोग्यदायी आहार आणि व्यायामातील सातत्य यात काटेकोरपणा ठेवला.

प्रेरणा

आपला प्रवास तंदुरूस्तीकडे सुरू आहे त्यामुळे सातत्यपूर्ण प्रयत्न करत राहायचे हे स्वतःला बजावत रहावे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर आठवड्याला वजन कमी होतंय हे पाहून स्वप्रेरणा मिळते. मग अधिक प्रयत्न केले जातात. वजन कमी केल्याने हलके वाटू लागते आणि आरोग्याच्या समस्याही कमी होतात.

जीवनशैली

कार्बोनेटेड पेये घेणे बंद करावे. तसेच तळलेले, अतितिखट, खारट आणि मैद्यापासूनचे पदार्थ टाळले. सुपाच्य आणि आरोग्यदायी पदार्थांचा आहारात समावेश केला. त्याचा वजन कमी होण्याच्या प्रवास खूप मदत झाली.

वजन कमी करण्याच्या (Weight loss tips in marathi) प्रवासात सातत्य फार महत्त्वाचे असते. व्यक्ती जेव्हा निरोगी आणि तंदुरूस्त असते तेव्हा स्वतःच्या कामावर आणि कुटुंबावरही व्यवस्थित लक्ष देऊ शकते. त्यामुळे स्वतः तंदुरूस्त रहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole