Weight Loss: वजन कमी करण्यासाठी फळं खाताय? या फळांमुळे कमी होण्याऐवजी वेगात वाढू लागेल वजन

Weight Loss in Marathi – आपण बहुतांश जण खूप ताणताणवात जगत असतो. त्याचा विपरीत परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. आपलं वजन वाढत जातं. आपण बेढब होत जातो. त्यांनतर आपण आहारावर लक्ष देतो (Diet for weight loss). आपण योग्य आहार घ्यायला सुरुवात करतो. आहारात फळांचा समावेश करतो. आपल्याला वाटतं आपण योग्य मार्गावर आहोत पण आपल्या हातून चुका घडत असतात. आपल्याला सर्व प्रकारची फळं वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरतात.

पण तसं नसतं…आपण अज्ञानात सर्व प्रकारची फळे खात राहतो. पण त्याच्यामुळे आपल्याला हवा असलेला परिणाम साध्य होत नाही. आपलं वजन उलटपक्षी वाढत राहतं..कशामुळे? अशी कोणती फळं आहेत जी वजन कमी करण्यासाठी खाणं वर्ज्य करावं (avoid fruits during weight loss diet).

एवोकॅडो (Avocado)-

बहुतांशी हे फळ उत्तर अमेरिकेत जास्त खाल्ले जाते. आपल्याकडेही हे खाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यामध्ये पाण्याचं प्रमाण खूप असतं. त्यानंतर स्निग्ध पदार्थ (fat), कर्बोदके (carbohydrates) आणि प्रथिने (Proteins), असे घटक पदार्थ असतात. हे फळ ब जीवनसत्त्व आणि के जीवनसत्वाचा मुख्य स्त्रोत आहे. एवोकॅडोच्या सेवनाने जी ऊर्जा मिळते त्याचा मुख्य स्रोत आहे फॅट. त्यामुळे आपल्या शरीरात अधिक कॅलरी जातात म्हणून वजन कमी करण्यासाठी (Weight Loss in Marathi) एवोकॅडो खाणे फायदेशीर ठरत नाही.

अननस (Pineapple) –

अननस हे एक रसदार फळ आहे. चवीला आंबट गोड असते, हे आपल्याला माहीत आहे. यामध्ये सायट्रिक आणि मॅलिक आम्ल (citric and malic acid) असतात. म्हणजे यांत क जीवनसत्व (Vitamin C) असते. म्हणजेच याच्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती (immunity power) सुधारते. आपल्या शरीरातील विषाक्त पदार्थ (toxic elements) बाहेर काढण्याची क्षमता या फळात आहे. काविळीसारख्या आजारात याचा आहारात समावेश केला तर फायदेशीर ठरतो. पण वजन कमी करण्याच्या काळात हे खाल्लं की यात असलेल्या जास्त प्रमाणातील शर्करेमुळे वजन वाढू शकते कारण शर्करा जास्त म्हणजे जास्त कॅलरी (high calorie content) म्हणून हे फळ वजन कमी करण्याच्या कालावधीमध्ये खाऊ नये.

Immunity Booster : हंगामी सर्दी-तापातून लगेच व्हाल रिकव्हर; हा आयुर्वेदिक काढा ठरेल गुणकारी

द्राक्षे (Grapes) –

द्राक्षे आपल्याकडे आवडतं त्याचप्रमाणे आर्थिक दृष्ट्या महत्वाचं फळ आहे. द्राक्षामध्ये कॅल्शियम (Calcium), फॉस्फरस (Phospharus), क जीवनसत्व अधिक प्रमाणात असतात. क्षय, ताप, अशक्तपणा, भूक कमी होणे या विकारांवर द्राक्ष लाभकारक ठरतात. यांत लोह (Iron) आढळते, म्हणून द्राक्ष रक्तवाढीसाठी उपयुक्त आहे. द्राक्षे चवीला गोड असतात, कारण त्यात शर्करा (sugar) असते. म्हणून द्राक्ष खाल्ल्यामुळे त्वरित ऊर्जा मिळते. त्यासोबत यांत पिष्टमय पदार्थ म्हणजे कार्बोहायड्रेट आढळतात. इतकी उपयुक्तता असूनही द्राक्षाच्या सेवनाने आपल्या शरीरात अधिक कॅलरी जातात. म्हणून यामुळे (Weight Loss in Marathi) वजन वाढतच राहते.

केळी (Banana)-

सर्वात सहज आणि स्वस्थ दरात मिळणारे हे फळ आहे. केळात कॅल्शियम आणि लोह आढळते म्हणून हाडांच्या विकारात याचा फायदा होतो. केळं स्वास्थ्य वर्धक व बळ वाढवणारे आहे. रक्ताची कमतरता जाणवणाऱ्यांनी केळं खावं. केळं खाल्ल्याने चयापचयाची क्रिया सुधारते. केळं हे कफकारक आहे, म्हणून केवळ दुपारच्या वेळातच खावे. केळात क्षार, प्रथिने यांचे प्रमाण कमी असते. पिष्टमय पदार्थांचे प्रमाण सर्वाधिक असते. ज्या व्यक्ती अंगकाठीने बारीक आहेत, त्यांना वजन वाढवण्यासाठी केळं उपयुक्त ठरते. म्हणून वजन कमी करण्यासाठी केळं खाऊ नये.

आंबा (Mango)-

हा फळांचा राजा आहे. आंबा न आवडणाऱ्या लोकांची संख्या खूप कमी असावी. उन्हाळा आंब्याशिवाय जातच नाही. आंबा ही औषधी गुणधर्म असणारं फळ आहे. यामध्ये अ जीवनसत्व (A Vitamin) अधिक प्रमाणात आढळतं. बुबुळांचा कोरडेपणा, डोळ्याला येणारी खाज, होणारी आग हे विकार आंबा खाल्ल्याने कमी होतात. आतड्याचं आरोग्य आंबा खाल्ल्यामुळं चांगलं राहतं..ज्या व्यक्तीची रोग प्रतिकारक शक्ती कमी असेल त्या व्यक्तीला दिवसातून तीन वेळेस आंबा चोखून खाण्यास सांगावा व त्यानंतर दूध पिण्यास सांगावे. पिकलेला आंबा हा पोटाचे विकार नाहीसे करणारा, शक्ती आणि उत्साह वाढवणारा आहे. त्याचबरोबर तो चरबी वाढवणारा आहे. वर नमूद केलेल्या दुधाच्या उपायामुळेही वजन वाढते. म्हणून आंबा हा वजन कमी करणाऱ्यांसाठी उपयोगी नाही.


1 Comment
  1. Akshay janrao says

    Thanks for information

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole