शेतकऱ्यांच्या पोरीची कमाल, घरीच अभ्यास करत पहिल्या झटक्यात UPSC केली पास

स्पर्धा परीक्षा हे स्वप्न अनेक जण पाहतात, त्यासाठी कष्ट घेतात. काहींना स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी विविध क्लासेस, पुस्तके मिळणाऱ्या लायब्ररी लावणे शक्य होते. केंद्रीय परीक्षा द्यायची म्हणून काही विद्यार्थी थेट दिल्ली वगैरे गाठतात. तर काही मुले पुण्या मुंबईत उत्तम दर्जा क्लासेस लावतात. अर्थात यासाठी पालकांना आणि विद्यार्थ्यांना बऱ्यापैकी पैसेही खर्च करावे लागतात. काही विद्यार्थ्यांना हे करणे शक्य होत नाही. तरीही त्यांच्या मनात युपीएससीचे स्वप्न रूंजी घालत असते. नियोजनपूर्वक अभ्यास करून ते यशस्वीही होतात. अशाच विद्यार्थ्यांपैकी एक म्हणजे श्रद्धा शिंदे

शेतकरी कुटुंबातील ही मुलगी. वडील अल्पभूधारक शेतकरी आहे. आईला तर लिहिता वाचताही येत नाही. पण श्रद्धाचे वडील नवनाथ शिंदे यांनी आपल्या लेकीला शिकवले, नुसतेच शिकवले नाही तर युपीएससीची परीक्षा देण्यास पाठिंबाही दिला. श्रद्धाने भारतीय अभियांत्रिकी सेवा परीक्षा- आईएस मध्ये राज्यातून प्रथम आणि देशातून ३६ वे येण्याचा पराक्रम केला.

श्रद्धा बीड या उसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातली. या जिल्ह्यातली पोरं आता शिक्षण, खेळ या क्षेत्रात उत्तम कामगिरी करून जिल्ह्याचे नाव एका वेगळ्या उंचीवर पोहोचवत आहेत. श्रद्धाने तर थेट केंद्रीय परीक्षेत पहिले येत जिल्ह्याला वेगळी ओळख दिली.

तर अशी ही श्रद्धा बीड जिल्ह्यातल्या लोणी शहाजनपूर इथं राहाणारी. शिक्षणासाठीही तिने प्रवासच केला. लोणी इथं शालेय शिक्षण घेतलेल्या श्रद्धाचे माध्यमिक शिक्षण बीड इथं झालं तर अभियांत्रिकीच्या पदवीसाठी तिने थेट औरंगाबाद गाठले. श्रद्धाने अभियांत्रिकीच्या शिक्षणातही घवघवीत यश मिळवले आहे. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने इलेक्ट्रीक इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. पदवी संपादन करतानाच तिने युपीएससी करण्याचे मनाशी ठरवले होते. त्यानंतर तिने सहा महिने केवळ सहा महिने युपीएससीचे क्लासेस केले आणि मग तिने स्वतःच अभ्यास केला. त्यानंतर जानेवारी २०२० मध्ये तिने युपीएससीची परीक्षा दिली आणि तिला पहिल्याच प्रयत्नात यशही मिळाले.

काबाडकष्ट करणाऱ्या आईवडिलांना आपल्या लेकीच्या यशाचा कोण आनंद झाला. वडील अभिमानाने सांगतात की श्रद्धाच्या यशामुळे मला आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण लाभला आहे. तिच्यासाठी आम्ही फार काही करू शकलो नाही पण श्रद्धाच्या शिक्षणाची आवड आम्ही जोपासली. त्यासाठी आम्ही तिला सतत साथ दिली. श्रद्धा शिंदे च्या लग्नावरूनही समाजातील अनेकांनी सल्ले दिले पण तिच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न साकारण्यासाठी आम्ही तिला साथ दिली.

श्रद्धानेही आपल्या आईवडिलांच्या कष्टाचे चीज करत आईवडिलांचे नाव मोठे केले, त्यांना समाजात एक प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आहे.
युपीएससी सारखी कठीण परीक्षा पहिल्या प्रयत्नात केवळ सहा महिन्याचे मार्गदर्शन, मग स्वतःच्या कष्ट आणि नियोजनपूर्वक केलेल्या अभ्यासातून श्रद्धाने पास केली आहे. त्यामुळे श्रद्धाच्या यशाचा तिच्या आईवडिलांना अभिमानच वाटत असणार.


हे ही वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.