यंदा ‘संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम’ संस्थेला शांततेसाठीचे नोबेल जाहीर !

जगातील सर्वोच्च सन्मान समजल्या जाणाऱ्या नोबेल पुरस्काराची यंदासाठीची घोषणा सुरु होण्यास सुरुवात झाली आहे.

यावर्षासाठी शांततेचे नोबेल पुरस्कार संयुक्त राष्ट्रांच्या वर्ल्ड फूड प्रोग्राम (डब्ल्यूएफपी) या संस्थेला देण्याचा निर्णय नॉर्वेमधील समितीने घेतला आहे.

‘या’ कार्यामुळे मिळाले नोबेल :

  • जगभरामध्ये तणावपूर्ण आणि युद्धजन्य परिस्थिती असणाऱ्या प्रदेशांमध्ये अन्न पुरवठा करण्याचे आणि तेथे शांततेसाठी डब्ल्यूएफपीने कार्य केले आहे.
  • डब्ल्यूएफपी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये ‘झीरो हंगर’ या मोहिमेसाठी अर्थात कोणीही उपाशी झोपू नये यासाठी प्रयत्न करत आहे.
  • दरम्यान, तणाव आणि अशांतता असणाऱ्या प्रदेशांमध्ये भूक हे वाद आणि संघर्षाचे कारण होऊ नये यासाठी तसेच त्या भागात शांतता राहावी यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे समितीने डब्ल्यूएफपीची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.