बेरोजगारांना इथे मिळेल न्याय; ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी थेट सुप्रीम कोर्टात नोकरीची संधी

Supreme Court of India Recruitment 2022

Supreme Court of India Recruitment 2022 + भारताचे सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Supreme Court Jr Court Assistant Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालय सहाय्यक या पदांसाठी ही भरती (Majhi Naukri) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) –

  • या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रात ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
  • तसंच उमेदवारांना 35 w.p.m पर्यंत इंग्लिश कम्प्युटर टायपिंग येणं आवश्यक आहे. तसंच सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांना कम्प्युटरच्या सर्व गोष्टींचं ज्ञान असणं आवश्यक आहे. .
  • उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
  • उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

  • कनिष्ठ न्यायालय सहाय्यक (Junior Court Assistant) – 63,068/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 10 जुलै 2022

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://examinationservices.nic.in/examsys22/root/home.aspx?enc=Ei4cajBkK1gZSfgr53ImFY7Opz8rrhi7HiNBBVaiudRq5bUYo4p+S66Vlvi7m6Sd या लिंकवर क्लिक करा.


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole