राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 प्रवेशपत्र जाहीर

११ ऑक्टोबर २०२० रोजी नियोजित असणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 चे प्रवेश प्रमाणपत्र आयोगायच्या साईटवर उपलब्ध झाले असल्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या प्रोफाईलद्वारे हे प्रवेशपत्र जाहीर झाले आहे. उमेदवारांना हे प्रवेशपत्र त्याच्या प्रोफाईलमध्ये लॉगिन करून मिळवता येईल तसेच लॉगिन मी करताही मिळवण्याची सोय आयोगाने केली आहे. याबाबत अधिक माहिती संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

ज्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 द्यायची आहे अश्याना हे प्रमाणपत्र आवश्यक असेल. या प्रमाणपत्राशिवाय उमेदवारांना आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखपत्र आणि त्याच्या दोन प्रति सोबत आणणे आवश्यक आहे. परीक्षा केंद्रात गेल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आत्ताच प्रत्येकाने प्रति काढून ठेवणे अधिक चांगले. https://mahampsc.mahaonline.gov.in/ या वेबसाईटला भेट देऊन आपण प्रवेशपत्र मिळवू शकता.

काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कोरोनाच्या पार्शवभूमीवर अजून कोणत्या कोणत्या गोष्टींची खबरदारी घ्यावी याबाबत पत्रक काढले आहे.

एप्रिल महिन्यात होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा दोनवेळा पुढे ढकलण्यात आली होती त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात खळबळ झाली होती. यावर दोन्ही बाजूनी प्रतिक्रिया समोर आल्या होत्या. अखेर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 (State Service Preliminary Examination, 2020) प्रवेशपत्र नुकतेच जाहीर झाल्याने या सगळ्याला पूर्णविराम मिळाला आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.