स्टार्स प्रकल्प (STARS)

महाराष्ट्रासह ६ राज्यांमधील शालेय शिक्षणाची गुणवत्ता आणि प्रशासन सुधारण्यासाठी स्टार्स प्रकल्प हा प्रकल्प सुरु करण्यात आला.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्रासह हिमाचल प्रदेश, ओडिसा, राजस्थान, मध्यप्रदेश व केरळ असे एकूण सहा राज्यांची परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स मधील कामगिरीच्या आधारावर निवड

STARS Strengthening Teaching-Learning and Results for States

उद्देश – राज्यातील शिक्षण पद्धतीचे अध्यापन, अध्ययन आणि परिणाम याचे बळकटीकरण करणे.

अर्थसहाय्य – जागतिक बँक

या योजनेवर केंद्रशासन ६० टक्के आणि राज्य शासन ४० टक्के या प्रमाणात खर्च करील.

कालावधी – पाच वर्षे (२०२०-२१ ते २०२४-२५)

स्टार्स प्रकल्पाची उद्दिष्टे – पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंतच्या विदयार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे, नियमित व गतिशील प्रयत्नांनी अध्ययन निष्पत्ती सुधारण्यावर भर देणे, योग्य व एकात्मिक शिक्षण देणे, शाळांच्या प्रशिक्षण व शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे, शैक्षणिक व्यवस्था पारदर्शक बनविण्यासाठी सर्वसमावेशक धोरण निश्चिती, विदयार्थ्यांचा सर्वांगीण विकास.

स्टार्स प्रकल्प ची अंमलबजावणी केंद्रीय प्रायोजित योजना म्हणून शिक्षण मंत्रालया अंतर्गत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाद्वारे करण्यात येते.

या प्रकल्पामुळे १.५ दशलक्ष शाळांमधील १० दशलक्ष शिक्षक आणि २५० दशलक्ष शालेय विद्यार्थ्यांना (६ ते १७ वर्षे वयोगटातील) फायदा होईल.


सर्व सरकारी योजना वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole