स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये 3261 जागांसाठी मेगाभरती; 12वी उत्तीर्ण उमेदवारांना मिळणार संधी

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये (Staff Selection Commission Recruitment) काही पदांच्या तब्बल 3261 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SSC Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. संबंधित विषयांमध्ये बारावी आणि ग्रॅज्युएशन पूर्ण असलेल्या उमेदवारांच्या पदांसाठी ही भरती (Staff Selection Commission Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी  दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. (ssc mts recruitment 2021 apply online) अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती

  • कनिष्ठ बियाणे विश्लेषक – 03
  • गर्ल्स कॅडेट इन्स्ट्रक्टर – 34
  • चार्जमन (मेकॅनिकल) – 03
  • चार्जमन (धातूशास्त्र) – 02
  • वैज्ञानिक सहाय्यक (एम अँड ई/मेटलर्जी) – 02
  • लेखापाल – 01
  • हेड क्लर्क – 01
  • पुनर्वसन समुपदेशक – 01
  • तांत्रिक अधीक्षक (विणकाम) – 01
  • तांत्रिक सहाय्यक (वन्यजीव) – 01
  • संशोधन अन्वेषक (वनीकरण) – 01
  • उपसंपादक (हिंदी)- 01
  • उपसंपादक (इंग्रजी)-01
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक (जीवशास्त्र) – 03
  • स्टाफ कार ड्रायव्हर (ऑर्ड. ग्रेड) – 01
  • मल्टी टास्किंग स्टाफ – 398
  • संरक्षण सहाय्यक तांत्रिक – 01
  • कनिष्ठ संगणक – 01
  • इत्यादी… (अधिक माहितीसाठी नोटिफिकेशन बघावं)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

SSC MTS Recruitment 2021 Apply Online या पदभरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी किंवा पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदानुसार विशेष शिक्षण घेतलं असणंही आवश्यक आहे.

प्रवर्गानुसार वयोमर्यादा

  • SC/ ST — अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 5 वर्षे सूट
  • OBC  — अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 3 वर्षे सूट
  • PwD — अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 10 वर्षे सूट
  • PwD+OBC — अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 13 वर्षे सूट
  • PwD+SC/ ST — अधिकतम वयोमर्यादेपेक्षा 15 वर्षे सूट

SSC MTS Recruitment 2021 Apply Online

या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांना SSC च्या https://ssc.nic.in. या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. तसंच ऑनलाईन अप्लाय करताना महत्त्वाचे कागदपत्रं अपलोड करायचे आहेत. यानंतर परीक्षेसाठीचं शुल्क भरून अप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे.

परीक्षा शुल्क  

खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क 100/- रुपये असणार आहे. तर महिला उमेदवार, SC, ST, PWD, EWS उमेदवारांना कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ssc.nic.in/Registration/Home या लिंकवर क्लिक करा


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


इतर सरकारी नोकरी –

5 Comments
  1. Dipesh Wavahal says

    Junior Sid interlist

  2. Harshali Sudhakar Birhade says

    Harshali Sudhakar Birhade

  3. Kartik borude says

    Borkhedi.gopal nantar jalana

  4. Vishakha ravindra sonawane says

    I am vishakha

  5. Kajal says
Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole