भारतीय रेल्वेत ३३७८ पदांची भरती, परीक्षेविना थेट नोकरी

Southern Railway Apprentice Recruitment 2021

Southern Railway Apprentice Recruitment 2021 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी चांगली बातमी आहे. भारतीय रेल्वेमध्ये दहावी पास युवकांसाठी मोठी संधी आहे. भारतीय रेल्वेच्या दक्षिण रेल्वे विभागात अप्रेंटिस पदांसाठी बंपर भरती जाहीर झाली आहे. दक्षिण रेल्वे विभाग अप्रेंटिस पदांच्या एकूण 3378 जागांसाठी भरती केली जाणार आहे.

यासाठी इच्छुक आणि योग्य उमेदवार जे या पदांसाठी अर्ज करू इच्छितात त्यांनी भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज देऊ शकतात. १ जूनपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होणार असून ३० जूनला अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे.

एकूण जागा : ३३७८

पदाचे नाव आणि जागा

१) कॅरेज वर्क्स, पेरंबूर –
२) गोल्डन रॉक कार्यशाळा – 756
३) सिग्नल अँड टेलिकॉम वर्कशॉप, पोदानूर – 1686

शैक्षणिक पात्रता :
अप्रेंटिस पदासाठी अर्ज करणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण आवश्यक असून त्याशिवाय संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण असलेले उमदेवार देखील अर्ज करु शकतात, त्यासाछी फिजीक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा अभ्यास केलेला असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
कमीत कमी वय 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेची अट शिथील केलेली आहे. फ्रेशर्स, आयटीआय आणि लॅब टेक्निशियन यांच्यासाठी वायीच अट 22 वर्ष आहे.

परीक्षा फी : 100 रुपये /- (एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही)

उमेदवारांची निवड कशा प्रकारे होईल?
उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख : ०१ जून २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३० जून २०२१

Southern Railway Apprentice Recruitment 2021 अधिकृत संकेतस्थळ : sr.indianrailways.gov.in


Trending Majhi Naukri

7 Comments
  1. Sachin says

    Hii

  2. Sachin says

    which are the like a railway

  3. Kiran Ghige says

    Hiiiiiiiiiiiiiiiiiii

    1. Kiran Ghige says

      Hello

  4. Kiran Ghige says

    Kiran Ghige

  5. Bapusaheb Jagannath Walekar says

    Hii

  6. Milind Sukhumi patil says

    Hii

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.