अर्धशिशी आणि आम्लापित्तावर एकदम जबरदस्त उपाय दररोज घ्यावा असा हर्बल टी….

आपल्यातले बहुतांश लोक हे वेळेवर जेवण, ठरलेलेच पदार्थ, ठराविक वेळ झोपणे या गोष्टी कसोशीने पाळताना दिसतात. पण यांत काही बदल झाला तर त्याचा तब्येतीवर परिणाम होताना दिसतो. अशा व्यक्तींना प्रसंगी अन्न न पचणे, आम्लपित्त किंवा अर्धशिशीच्या समस्या होताना दिसतात. (Improper digestion, Acidity, Migraine) या समस्या केव्हा उद्भवतील, याबद्दल ठाम काही कोणी सांगू शकत नाही. पण यांवर उत्तम उपाय आयुर्वेदाकडे आहेत (Solution on Acidity and Migraine by Ayurveda)

का होते अर्धशिशी व आम्लपित्त? 

१. आयुर्वेदानुसार शरीरातील तीन प्रकृतींपैकी वातप्रकृतीत होणारी वाढ आणि पित्तप्रकृतीचा असमतोल ही महत्वाची कारणे आढळून येतात. 

२. तिखट, आंबट, मसालेयुक्त, आंबवून बनवलेले आणि खारवलेले पदार्थ वरचेवर खात राहणे. 

३. उरलेले अन्न फ्रीजमध्ये ठेवून पुन्हा पुन्हा गरम करून जास्त काळापर्यंत खात राहणे.

४. वारंवार मांसाहार करणे

५. सकाळी उपाशी पोटी कॉफी पिणे.

६. तळीव पदार्थ रात्री खाणे.

७. सतत प्रवासात असणे, त्याचा ताण येणे, त्यामुळे झोपेचे वेळापत्रक बिघडणे आणि याचा परिणाम म्हणून रागराग होणे.

या समस्या कमी कशा करायच्या?

या समस्यांची दिलेली कारणे वाचली असता आपल्याला कोणत्या सवयी अपायकारक आहेत याची कल्पना आली असेल. सकाळी आपण रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणं हे अयोग्य आहे. यातूनच पित्त उसळतं व अर्धशिशी आणि आम्लपित्ताचा त्रास होऊ शकतो.

असा बनवा हा हर्बल टी 

१ मोठा चमचा धणे, १ मोठा बडीशेप, ७-८ पुदिन्याची पाने, १० – १२ कढीपत्याची पाने आणि ग्लासभर पाणी घ्यावं. 
एका भांड्यात हे सगळं एकत्र करावं, ३-५ मिनिटे हे साहित्य उकळून घ्यावं. एका गाळण्याने हे सर्व गाळून घ्यावं. रोज सकाळी गरम गरम हा हर्बल टी उपाशी पोटी नियमितपणे प्यावा. याचा परिणाम लवकरच जाणवू लागेल आणि आपला आम्लपित्त आणि अर्धशिशीचा त्रास कमी होऊन जाईल.   


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole