व्यवस्थित झोप होऊनही थकल्यासारखं वाटतंय? या 4 टीप्स वापरून बघा

काम रात्री उशीरा पर्यंत चालतं आणि सकाळी पुन्हा लवकर उठून कामाची सुरुवात करावी लागते. किंवा नीट झोप घेऊन सुद्धा जेंव्हा सकाळी उठू तेव्हा फारसा उत्साह वाटत नाही. विश्रांती घेऊनही थकवा जाणवू लागल्यावर आपल्याला असं वाटून जातं की आपली तब्येत बिघडली तर नाही ना असं वाटून जातं.

पण असा विचार करण्याची गरज नाही. कामानिमित्त होणाऱ्या धावपळीमुळे जीवनशैली मध्ये खूप बदल होत आहेत. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होताना आपल्याला दिसून येतो. आपल्याला सकाळी उठल्यावर ताजंतवानं वाटायला हवं तसं न वाटता दमल्यासारखं वाटत राहतं. म्हणून आपण करायला हव्यात या गोष्टी.

कॉफी घेत असाल तर कमीच घ्या…

कॉफी आपण उत्साह वाढावा म्हणून पित असतो. कारण कॅफेन असणारे पदार्थ प्यायल्याने आपला थकवा दूर होतो. पण १-२ कप कॉफी संपूर्ण दिवसभरात आपण प्यायलो तर काही हरकत नाही, पण याहून जास्त प्रमाणात कॉफी शरीरात गेल्यास याचा उलट परिणाम होतो व आपल्याला अधिक थकवा येण्याची शक्यता असते.

नाश्त्याची वेळ ठरवा

दिवसांत आपण तीन ते चार वेळेस खात असतो, परंतु या सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे सकाळचा नाश्ता. एका म्हणीनुसार राजासारखा सकाळचा नाश्ता करायला हवा. या पेटभर नाश्त्यामुळे आपल्याला दिवसभराच्या कामासाठी हवी असणारी ऊर्जा मिळते. म्हणून सकाळच्या नाश्त्याची एक योग्य वेळ ठरवणं खूप गरजेचं आहे. कारण गरजेची ऊर्जा जर का वेळेवर मिळाली नाही तर आपल्याला थकवा जाणवू शकतो.

जेवण प्रमाणबद्ध असायला हवं.

जेवण करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की आवडते पदार्थ असतील तरीही एकदम पोट भरून जेवू नका. कारण इतकं जेवून सहजच जडपणा येतो आणि काम करण्यासाठी उत्साह राहत नाही. एकदम सगळं खाण्यापेक्षा दिवसातून सहा वेळेस खाणं जास्त चांगलं आहे.

पाणी किती पिता?

जेवणाच्या वेळा आणि प्रमाण त्याचबरोबर पाणीही किती वेळा व किती प्रमाणात पितो हे पाहणं ही महत्वाचं आहे. कारण पाणी पिण्याकडे तितकं लक्ष देत नाही. कारण शरीरातील पाण्याची पातळी जर का कमी झाली तरीही आपल्याला दमल्यासारखं वाटतं. म्हणून थोड्या – थोड्या वेळाने पाणी पिऊन आपल्या शरीरात पाणी प्रमाण संभाळावं.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole