MPSC ची परीक्षा देणारे विद्यार्थी २६ लाखांच्यावर, कर्मचाऱ्यांचा मात्र तुटवडा

दिवसेंदिवस सरकारी नोकरी मिळवण्यासाठी तरुणांनाची संख्या आता वाढू लागली आहे. याचाच भाग म्हणून देशभरातील विविध सरकारी पदांसाठी घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षेसाठी परिक्षार्थींची संख्या तुफान वाढत आहे. यामुळे परीक्षा घेणाऱ्या आयोगांना सुद्धा आता तंत्रज्ञान सिद्ध होण्यासोबतच कर्मचाऱ्यांची संख्या वाढवणे गरजेचे आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC च्या विविध परीक्षांना बसणाऱ्या परिक्षार्थींची संख्या गेल्या दहा वर्षात ५ लाखांवरून तब्बल आता २६ लाखांवर आली आहे. यावरून तरुणांनाचा सरकारी नोकरीकडे वाढणारा ओघ आपल्या लक्षात येईल. पण संख्या एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली तरी महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSC मध्ये कर्मचारी तेवढेच आहेत उलट राज्य शासनाने आता कर्मचारी कमी करण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे.

MPSC च्या विविध परीक्षांना बसणाऱ्या विदयार्थ्यांची संख्या २०११ च्या दरम्यान ५ लाख एवढी होती, त्यानंतर २०१२-१३ मध्ये ८ लाख, २०१६-१७ मध्ये ११ लाख, आणि २०१८-१९ मध्ये तब्बल हि संख्या २६ लाखांवर गेली असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. यामुळे दिवसेंदिवस आयोगाकडे विविध परीक्षांचा ताण वाढत आहे यातच शासनाने नवीन भरतीमध्ये काही पदे कमी केल्याने अडचण निर्माण झाली आहे आणि खुद्द आयोगालाच आता कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत आहे.

वर्ष परीक्षेस अर्ज करणारे विद्यार्थी

२०१०-११ – ५,५६,८३९
२०११-१२ ५,६७,५०१
२०१२-१३ ८,३४,५७२
२०१३-१४ ११,०५,३०५
२०१४-१५ ४,५२,४०७
२०१५-१६ ५,२९,६९३
२०१६-१७ ११,३४,२००
२०१७-१८ १७,४१,०६९
२०१८-१९ २६,६४,०४१

गेल्या दहा वर्षात आयोगाच्या परीक्षा विविध देणाऱ्या विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे. त्या तुलनेत कर्मचारी संख्या वाढली नाही. आयोगाला पुरेसे मनुष्यबळ दिले तरच ते परिणामकारकपणे काम करू शकते. त्यामुळे आढावा घेऊन आयोगाला पुरेसे मनुष्यबळ द्यायला हवे.
– व्ही.एन. मोरे,माजी अध्यक्ष ,एमपीएससी


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole