भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी सतर्क नागरिक अ‍ॅप

जम्मू व काश्मिर केंद्रशासित प्रदेशाचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते सतर्क नागरिक अ‍ॅप नामक एका मोबाईल अॅपचे अनावरण करण्यात आले. भ्रष्टाचाराला आळा घालणे हे या अॅपचे उद्दीष्ट असून त्याच्या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्य सरकारचे दक्षता अधिकारी विभाग या सतर्क नागरिक अ‍ॅप चे व्यवस्थापन बघणार आहे.

‘एज्युकॉन -2020’: आंतरराष्ट्रीय अखंड परिषद

7 जानेवारी 2021 रोजी केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या हस्ते दोन दिवस चाललेल्या आभासी एज्युकॉन 2020 नामक आंतरराष्ट्रीय अखंड परिषदेचे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. जागतिक शांतता पुनर्स्थापित करण्यासाठी युवकांच्या परिवर्तनासाठी शिक्षण कल्पना ही या कार्यक्रमाची संकल्पना होती.

ग्लोबल एज्युकेशनल रिसर्च असोसिएशन (GERA) संस्थेच्या सहकार्याने केंद्रीय विद्यापीठ पंजाब (भटिंडा) या संस्थेनी ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित केली होती. परिषदेत ब्रिटन, कॅनडा, थायलँड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भुटान आणि भारतातल्या अभ्यासकांनी मुख्य संकल्पनेला पकडून दहा उपसंकल्पनांवर 31 तास अखंड चर्चा केली.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole