या चुका कराल तर वजन अजिबात होणार नाही कमी….

वजन वाढ (Weight gain problem) ही सध्याच्या काळातली एक मोठी समस्या आहे. प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला संकल्प केला जातो की आता वजन कमी करायला सुरुवात करायची. मग आपण जीम जॉईन करतो, मॉर्निंग वॉकला जाणं असे हरेक तऱ्हेने प्रयत्न करू लागतो. पण अपेक्षित परिणाम दिसत नाही. आपलं वजन काही कमी होताना दिसत नाही. कारण हे करताना आपण तणावात जातो. आपल्या मनात नसतानाही आपल्याला काही गोष्टी कराव्या लागतात. यामुळे वजन कमी करण्यासाठी हे उपयोगी ठरत नाही. 

प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर याबाबत काही उपयोगी सल्ले देतात. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून त्या याविषयाबाबत जनजागृती करत असतात. व्यायामाचे प्रकार, आहाराबाबत सल्ले अशा प्रकारचे व्हिडिओ ऋजुता दिवेकर पोस्ट करताना दिसतात. म्हणून मोठ्या संख्येने लोक त्यांना फॉलो करतात. त्याच्या एका व्हिडीओमध्ये त्यांनी वजन कमी करताना काय करू नये हे सांगितलं आहे. (Rujuta Divekar advised about don’ts while doing weight loss)

१. हेच एकमेव नाही.

आपल्याला वजन कमी नक्कीच करायचे आहे. परन्तु आपला तोच एकमेव उद्देश आहे असं नाही. त्याच्याबरोबर आयुष्यातील अन्य गोष्टीही तितक्याच महत्वाच्या आहेत, याचंही भान आपल्याला असायला हवं. 

२. नवीन गोष्ट करताना वेळ लागणार आहे.

आपण व्यायाम उत्साहाने करायला सुरुवात करतो, पण तो आपल्या सवयीचा होण्यासाठी काही वेळ लागणार आहे. एकदम ते आपल्या पचनी पडणार नाही, म्हणून यासाठी एकदम आग्रही राहून काम होणार नाही. हळूहळू ती सवय लावून घ्यायला लागेल म्हणून तेवढा वेळ जाऊ द्यावा.

३. व्यायामाचा आनंद घ्या.

वजन करणे हा व्यायाम करण्याचा हेतू आहेच, पण त्याचबरोबर आपली तब्येत नीट राहणे हे ही त्याला जोडून येतेच. वजन कमी करण्यासाठी व्यायाम करताना व्यायामाचा ताण येऊ देऊ नका. त्याचा आनंद लुटा म्हणजे त्याचा आपल्याला सकारात्मक परिणाम अनुभवायला मिळेल.

४. तोंड बंदच करायचे आहे असे नाही.

वजन कमी करायचं म्हणजे भरपूर पथ्ये पाळायला हवीत. खान-पानातील बऱ्याच गोष्टी बाद करायच्या असा सर्वसामान्य समज झालेला आहे. डाएट करणे म्हणजे बंधने आणणे नव्हे तर तर खाण्याच्या वेळा, खाण्याचे प्रमाण आणि सवयी या सगळ्याचं एक सुयोग्य वेळापत्रक असतं. आपल्या आवडीच्या गोष्टी खाल्ल्या म्हणजे तो अपराध नाही, पण वेळापत्रक समजून खायला हवं.  

५. सतत खाण्याच्या, वागण्याच्या सवयींवर लक्ष नको.

वजन वाढ होण्यासाठी आपल्या खाण्याच्या वागण्याच्या सवयी कारणीभूत झाल्या आहेत, ही बाब खरी आहे. वजन कमी करताना आपण या सगळ्या गोष्टींवर अत्यंत बारीक नजर ठेवू लागतो. काय खाल्लं, काय केलं याचा आपल्या वजनावर परिणाम पुन्हा वाढ होईल या भीतीने सतत कॅलरीचा हिशोब आपण करू लागतो. पण याचा उपयोग होताना दिसत नाही.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole