महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाअंतर्गत भरती, पगार 40000 पर्यंत मिळेल

महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयाअंतर्गत भरती (Recruitment of Directorate of Maharashtra Urban development mission 2022) निघाली आहे, यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून २५ जानेवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

पदांच्या एकूण १२ जागा भरण्यात येणार आहे. याअंतर्गत मुंबईत ३ पदे, कोकण विभागासाठी १ पद, पुणे विभागासाठी २ पद, औरंगाबाद विभागात २ पदे, नाशिक विभागात २ पदे, नागपूर आणि अमरावती विभागात प्रत्येकी १ पद भरले जाणार आहे.

शैक्षणिक पात्रता :

यासाठी उमेदवारांकडे बीई/बीटेक/बीआर्क/एमएससी (एनव्हार्यन्मेंट) मध्ये बॅचलर डिग्री असणे गरजेचे आहे.

अनुभव
उमेदवाराकडे स्वच्छ भारत अभियान नागरी अंतर्गत कामाचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. महापालिका/ नगरपरिषद/ राष्ट्रीय प्रकल्पाअंतर्गत कामाचा किमान ३ वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे.

इतका मिळेल पगार :
विभागीय तांत्रिक तज्ञ म्हणून निवड झालेल्या उमेदवाराला दरमहा ४० हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

नोकरी ठिकाण : मुंबई, कोकण, पुणे, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २५ जानेवारी २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.smmurban.com

जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


इतर सरकारी नोकरी –

‘इंडियन ऑईल’ मध्ये 570 पदांसाठी भरती, 12वी उत्तीर्ण अर्ज करू शकतात

ESIC मध्ये 3847 पदांची जम्बो भरती, 10वी ते पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची संधी

MPSC मार्फत विविध पदांच्या 900 जागांसाठी भरती, पदवीधरांना मोठी संधीनाशिक चलन नोट मुद्रणालयात विविध पदांची भरती

SEBI मध्ये विविध पदांच्या १२० जागा, 55000 पगार

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole