Immunity Booster : हंगामी सर्दी-तापातून लगेच व्हाल रिकव्हर; हा आयुर्वेदिक काढा ठरेल गुणकारी

आपल्याकडे सर्वसाधारण पणे तीन ऋतू आहेत, ऋतू बदल होताना वातावरणातही एकदम बदल जाणवतो. आणि अचानक बदलेल्या वातावरणाचा शरीरावर परिणाम जाणवतो. आपली तब्येत या काळात बिघडते. आणि हमखास होतो तो म्हणजे सर्दी – खोकला..आता साधा सर्दी – खोकला म्हणून कुणीही त्याला हलक्यात घेत नाही. कारण वैश्विक महामारी (Pandemic) काय असते? ते आपण सर्वांनी अनुभवलं आहे. साधा सर्दी – खोकला (common cough- cold) या ठराविक काळात होतो, याला कारणीभूत असतो तो विषाणू संसर्ग ज्याला डॉक्टरी भाषेत viral infection म्हणतात. बहुतांश वेळा Rhinovirus याच्यासाठी कारणीभूत असतो. म्हणून ही आपण अंगावर न काढता त्यावर लगेच उपाय करणं गरजेचं असतो अन्यथा तोही त्रासदायक ठरतो.


म्हणून यांवर आपल्याकडे आजीचा बटवा आहे. तरुण पिढीला तर हा काय प्रकार आहे, हे लवकर समजणार नाही. हा एक डबा असायचा, यांत औषधी वनस्पती भरलेल्या असायच्या. या औषधी वनस्पती म्हणजे मसाल्याचे पदार्थ असतात. याच औषधी वनस्पतींपासून आपल्या रोग – आजारांमध्ये घरगुती उपाय करण्यासाठी वापरल्या जायच्या. अशाच घरगुती वनस्पतींपासून तयार होणारा आयुर्वेदिक काढा आपल्याला विषाणू संसर्गामुळे होणाऱ्या सर्दी – खोकल्यापासून आपल्याला सुटका मिळेल. आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास ही मदत होते.

कसा बनवावा आयुर्वेदिक काढा ?

  • ६ -७ काळ्या मिरीचे दाणे
  • चिमूट ओवा
  • चिमूट बडीशोप
  • लवंग ५ ते ६.
  • १ आल्याचा तुकडा
  • २ गुळाचे खडे
  • १ मोठी वेलची
  • १ चमचा घरगुती चहा मसाला.
  • ५ दालचिनीच्या छोट्या काड्या.

एका पातेल्यात २ ग्लास पाणी घेऊन उकळून घ्यावं. त्यात आल्याचा तुकडा किसून घालावा. त्याचबरोबर बाकीचे उरलेले घटकही टाकावेत. पाण्याला काळसर रंग येईपर्यंत चांगल्याप्रकारे पाणी उकळावं.

आयुर्वेदिक काढा चा फायदा –

ओवा, लवंग, बडीशेप, वेलदोडा, काळी मिरी मसाल्याचे पदार्थ त्यांच्यात जीवणुविरोधी तसेच दाह हारक गुणधर्मांमुळे औषधी आहेत. सर्दी – खोकला सुरू होण्याआधी आपला घसा खवखवतो म्हणजेच घशाचा दाह होत असतो. तसेच प्रतिकारकशक्तीला बळकटी येते. आपल्याकडे रोजच्या आहारात मसाल्याच्या पदार्थांचा वापर केला जातो तो याच कारणामुळे.
आल्याचा उपयोग श्वसन मार्गातील अशा संसर्गावर गुणकारी ठरतो. गूळ चवीला गोड आहे पण त्याचेही औषधी उपयोग आहेत. गुळाच्या सेवनाने संसर्गात आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole