देशातील मोठ्या IT कंपन्यांमध्ये Job हवाय? मग ‘या’ टॉप ट्रेंडिंग Programming Languages आताच शिका

आजकालच्या काळात इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा IT क्षेत्राकडे (Career in IT sector) उमेदवारांचा आणि ग्रॅज्युएट फ्रेशर्सचा (Jobs for Graduate freshers in IT) कल जास्त आहे. यामागची कारण म्हणजे या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी (Jobs in IT fields). सध्या भारतातील IT कंपन्या जोमात आहेत. येत्या वित्तीय वर्षात अनेक IT कंपन्या फ्रेशर्स आणि प्रोफेशनल्ससाठी बंपर पदभरती करणार आहेत.

पण IT क्षेत्रात जॉब (Eligibility to get IT jobs) मिळवणं तुम्हाला वाटतं तितकं सोपं नाही. इथे जॉब मिळवण्यासाठी प्रोग्रामिंग लँग्वेज (best Programming Languages to learn for jobs) शिकणं महत्त्वाचं आहे. मात्र नक्की कोणती Programming Language शिकावी? (Which Programming Language is best?) कोणत्या Programming Language मुळे जॉब मिळू शकतो? असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात. आज आम्ही तुम्हाला Career in IT sector साठी टॉप ट्रेंडिंग Programming Languages बद्दल सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

C , C++

C++ ही स्थिर, सामान्य-उद्देश, ऑब्जेक्ट-ओरिएंटेड लँग्वेज आहे. डेटाबेस व्यवस्थापन प्रणाली, ऑपरेटिंग सिस्टम, वैद्यकीय अनुप्रयोगमध्ये ही प्रोगामिंग लँग्वेज अनेक क्षेत्रांमध्ये वापरली जाते. ही सर्वात बेसिक आणि शिक्षणादरम्यान शिकवली जाणारी लँग्वेज आहे.

Python

IEEE स्पेक्ट्रमच्या लँग्वेजेसच्या रँकिंगमध्ये पायथन सर्वात वरच्या स्थानावर आहे, ज्याचा स्कोअर 100 परिपूर्ण आहे. शिवाय, Python ची समर्थन टक्केवारी 44.1% आहे. Python कोणत्याही गोष्टीसाठी योग्य आहे. यामध्ये Django आणि Flask आहे ज्याचा उपयोग वेब डेव्हलपमेंटसाठी केला जाऊ शकतो, तर Jupiter आणि Spyder सारखी वैज्ञानिक साधने विश्लेषण आणि संशोधनासाठी वापरली जातात.

Read Now – IT JOBS: Wipro कंपनीत BCA आणि B.Sc पास उमेदवारांसाठी बंपर Vacancy

मशीन लर्निंगमध्ये वापरल्या जाणार्‍या बहुतेक फ्रेमवर्क आणि लायब्ररी केवळ Pythonमध्ये बनवल्या जातात, त्यामुळे तुम्हाला जर मशीन लर्निंग शिकायचं असेल तर तुम्हाला Python शिकणं आवश्यक असतं. Python चा कोर्स केल्यानंतर (Python courses Online) IT क्षेत्रातील बऱ्याच जॉब्सची दारं तुमच्या साठी खुली होतात.

Java

Java मध्ये विविध प्रकारच्या लायब्ररी आणि फ्रेमवर्क आहेत जे हुड अंतर्गत Java वापरतात. स्प्रिंग आणि हायबरनेटद्वारे अॅप डेव्हलपमेंटसाठी Java वापरला जातो. JUnit Java प्रकल्पांसाठी युनिट चाचण्या सेट करण्यात मदत करते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मूळ Android डेव्हलपमेंटमध्ये Java वापरला जात आहे. त्यामुळे java हा फ्रेशर्सपासून अगदी प्रोफेशनल्सपर्यंत महत्त्वाची प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. Java शिकण्यासाठी या एक ऑनलाईन आणि Online कोर्सेस (Java courses online) उपलब्ध आहेत. Java चं शिक्षण घेतल्यानंतर अनेक मोठ्या IT कंपन्यांमध्ये तुम्हाला job मिळू शकतो.


2 Comments
  1. Ranjit says

    Yes

  2. Asdfg says

    Thank you

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole