तुम्ही फोन कसा पकडता? एक कृती उलगडेल व्यक्तीमत्त्वाचे मोठे रहस्य

स्मार्टफोन्स आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहेच. मात्र मोबाईल तुमच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज देणारा ठरू शकतो असे सांगितलं तर कदाचित तुम्हाला ते खरं वाटणार नाही. पण मोबाईल धऱण्याच्या स्टाईलवरून व्यक्तिमत्वाचा अंदाज लावता येतो. होय आपल्या फोन पकडण्याच्या स्टाईलवरून आपल्या व्यक्तिमत्वाचे रहस्य उलगडू शकते.

व्यक्तिमत्व हे अनेक गोष्टींतून घडते. त्यातही व्यक्तीच्या कृती त्याच्या व्यक्तिमत्वाचा आरसा ठऱतात. आपण कसे उभे राहातो, बोलतो, पाहातो या सर्व गोष्टींचा समावेश व्यक्तिमत्वाचा अंदाज लावण्यासाठी केला जातो. मात्र मोबाईल धरण्याच्या पद्धतीचाही व्यक्तिमत्व विकासाशी संबध असू शकतो ही गोष्ट नवलाईचीच आहे.

व्यक्तिमत्वाचा कस लागतो तो व्यक्ती एखादी परिस्थिती कशी हाताळतो, लोकांना कसं समजून घेतो यावरून व्यक्तिमत्वाचा अंदाज लावला जातो. तसाच अंदाज तुम्ही मोबाईल कशा पद्धतीने पकडता यावरून लावला जातो. मोबाईल पकडण्याच्या पद्धतीवरून तुमचे व्यक्तिमत्व आणि जीवनशैली कशी आहे याचा अंदाज लावता येतो.

1

याविषयी चार पद्धतीने फोन पकडला जात असल्याचे चित्रही उपलब्ध आहे, त्याचाही संदर्भ तुम्ही घेऊ शकता. एका हाताने फोनला सपोर्ट आणि दुसऱ्या हाताचा अंगठ्याने स्क्रोल करणे ही बहुतेकांची फोन धरण्याची पद्धत आहे. या पद्धतीचे व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विश्लेषण केले जाते ते असे की तुम्ही अशा पद्धतीने फोन धरलात तर जबाबदार, स्मार्ट आणि शहाणी व्यक्ती म्हणून तुमच्याकडे पाहिले जाईल. तुम्ही परिस्थिती समजून घेता, सावध असता आणि विचार करून पाऊल टाकता. तुम्हाला इतर व्यक्ती फसवू शकत नाहीत, ते कठीण असते. प्रेमाबाबत मात्र तुम्ही अविचारी ठरता आणि पटकन निर्णय घेता.

2

दुसरी पद्धत म्हणजे एका हाताने फोन धरून त्याच अंगठ्याने स्क्रोल करणे. याचा अर्थ तुमचा आत्मविश्वास अतिशय चांगला आहे. हुशारीने परिस्थिती हाताळता, जोखीम घ्यायला तुम्ही घाबरत नाही. प्रेमात पडला असाल तर मोठा निर्णय घेण्यापुर्वी व्यक्तीला जाणून घेण्यासाठी प्रयत्नशील राहाल त्यासाठी वेळ काढाल.

3

तिसऱ्यात तुम्ही एका हाताच्या तर्जनीचा वापर करून फोन स्क्रोल करता. सर्जनशील कल्पना यांच्या डोक्यात सतत असतात. त्या कल्पना ते अमलातही आणतात. एकटेपणा यांना प्रिय असतो. सतत नव्या लोकांशी मैत्री करता, तरीही प्रेमाच्या बाबतीत लाजाळू आहात. जे काम हाती घ्याल ते तडीत नेण्यात हातखंडा असतो.

4

फोन हाताळताना दोन्ही हातांचा वापर करण्याची चौथी पद्धतही अनेकांच्या बाबतीत पहायला मिळते. या लोकांना वेगाचे आकर्षण असते. ते जलद असतात शिवाय कार्यक्षम आणि निर्णय घेण्यासाठी तयार असतात. बदलत्या परिस्थितीशी, वातावरणाशी जुळवून घेऊ शकतात. प्रभावीपणे कामही करू शकतात. प्रेमाचा विचार केला तर मात्र तुमची कार्यक्षमता फारशी नसते.

या चारही पद्धतींपैकी आपली स्टाईल कोणती आहे हे पाहून स्वतःच्या व्यक्तिमत्वाचा अंदाज घ्या.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.