आता घरबसल्या आधार कार्ड वरील चुकीची माहिती बदलता येणार

आज भारतात आधार कार्ड हे सर्वात महत्वाचं ओळखपत्र गणलं जातं. साधं सिम कार्ड घेण्यापासून ते बँक अकाउंट व पासपोर्ट काढण्यासाठी सुद्धा आधार कार्ड आवश्यक आहे. जरी आपल्या सगळ्यांकडे आधार कार्ड असले तर बहुतेकांच्या कार्डवर चुकीची माहिती छापून आलेली आहे. हि चुकीची माहिती दुरुस्त करण्यासाठी लोकांना बराच त्रास घ्यावा लागतो.

याव्यतिरिक्त आधार कार्ड विसरले किंवा हरवले तरी ते पुन्हा मिळवण्यासाठी खटाटोप करावीच लागते. ह्या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन सरकारने यावर एक सोपा उपाय शोधला आहे.

काही दिवसांपूर्वीच भारत सरकारने mAadhaar App चं नवीन अपडेट आणलं आहे. आधार कार्यालयात न जाता ह्या ऍपच्या मदतीने तुम्ही घरबसल्या आधार कार्डशी निगडित कामे करू शकता.

mAadhaar App चे फायदे

  • mAadhaar App मध्ये आधार डाउनलोड करून त्याचा ओळखपत्र म्हणून वापर केला जाऊ शकतो.
  • घरातील ५ सदस्यांचे आधार कार्ड तुम्ही यात डाउनलोड करून ठेऊ शकता.
  • कुठलेही कागदपत्र न देता आधार कार्ड वरील पत्ता बदलता येतो.
  • तसेच जवळील आधार कार्यालयाची माहिती सुद्धा mAadhaar App च्या मदतीने मिळू शकते.

5 Comments
  1. Vikas bhagwan vaidya says

    Aadhar

  2. Kiran Ghige says

    Hiiiiiiiiiiiiiiiiiii

  3. HITESH SAMADHAN PATIL says

    Adhar update

  4. Divya suresh uke says

    Aadhar name Cheng

  5. 8208055922 says

    Mujhe aadhar seva khol ni hai
    Adhar seva khol ne ke liye kya kar na honga mujhe information chahiye help kardo

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.