‘नीट-2020’ परीक्षेचा निकाल लवकरच होणार जाहीर; असा पहा निकाल

12 ऑक्टोबरच्या आधी नीट परीक्षेचा निकाल ( Neet Result 2020) जाहीर केला जाऊ शकतो अशी माहिती नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी रोल नंबर, जन्मतारीख आणि सिक्यॉरिटी पिन आवश्यक असून निकालानंतर एनटीए कॅटेगिरीनुसार कट ऑफ स्कोअर जाहीर होईल.

असा पहा NEET Result :

  • सर्वांत आधी ntaneet.nic.in हे नीटचे अधिकृत संकेतस्थळ उघडावे.
  • याठिकाणी नीट अ‍ॅप्लिकेशन नंबर, जन्मतारीख, सिक्यॉरिटी पिन टाकावा.
  • वरील गोष्टी टाकून सबमिट केल्यावर नीट 2020 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
  • सदरील निकाल सेव्ह करून त्याची प्रिंट काढावी.

दरम्यान, सदरील परीक्षा 13 सप्टेंबर रोजी देशभरातील 3,843 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती, यासाठी जवळपास 15.97 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole