पोलीस उपनिरीक्षक पदाची शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम जाहीर होणार.

(MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षेचा निकाल मार्च २०२० मध्ये जाहीर केला होता त्यानंतर कोरोनाच्या प्रसारामुळे शारीरिक चाचणी बाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नव्हती. आज २८ सप्टेंबर २०२० रोजी पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदाची शारीरिक चाचणी आणि मुलाखतीचा कार्यक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने लवकरच महाऑनलाईन या आयोगाच्या वेबसाईट्वर जाहीर होणार असल्याचे पत्रक आज प्रसारित केले आहे.

यावेळी (MPSC) महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे उमेदवार शारीरिक चाचणी साठी पात्र ठरले आहेत त्यांनी शारीरिक चाचणीच्या सरावला लागण्याचे सांगितले आहे. कोरोनाच्या पार्शवभूमीवर राज्य आणि स्थानिक प्राधिकरणाकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असेही सूचित केले आहे.

महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित मुख्य परीक्षा २८ जुलै २०१९ आणि १ ऑगस्ट २०१९ ला अनुक्रमे पेपर १ आणि पेपर २ महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आली होती. त्याचा निकाल जाहीर झाला तरीही शारीरिक चाचणीसाठी कोणतीही हालचाल न झाल्याने उमेदवारांमध्ये अस्वस्थता होती ती आता या पत्रकाने दूर झाली आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole