MPSC Prelims Exam 2022: एमपीएससी पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

MPSC Prelims Exam 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (MPSC Rajyaseva Pre Exam 2022) १६१ पदांसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२२ घेतली जाणार आहे. २१ ऑगस्टला राज्यभरातील ३७ केंद्रांवर पूर्व परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 जून 2022 असणार आहे.

एकूण जागा : 161

पदाचे नाव:

सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा – एकूण पदे ९
मुख्याधिकारी, नगरपालिका/नगरपरिषद – २२ पदे
बाल विकास प्रकल्प अधिकारी – २८ पदे
सहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क – २ पदे
उप अधीक्षक, राज्य उत्पादन शु्ल्क – ३ पदे
कक्ष अधिकारी – ५ पदे
सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी – ४ पदे
निरीक्षक प्रमाणित शाळा व संस्था व अन्य – ८८ पदे
एकूण पदांची संख्या – १६१

पूर्व परीक्षेतील निकालाच्या आधारे २१ ते २३ जानेवारी किंवा त्यानंतर मुख्य परीक्षा होण्याची शक्यता आहे. या पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासह आरक्षण, पात्रता, भरती प्रक्रियेतून बाहेर पडणे या संदर्भातील सूचनाही देण्यात आल्या आहेत.

पदसंख्या आणि आरक्षणामध्ये राज्य शासनाच्या विभागांच्या सुचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. नमूद केलेल्या संवर्गांव्यतिरिक्त नवीन संवर्गातील पदांचा नंतरच्या टप्प्यावर समावेश होण्याची शक्यता आहे. त्यानुसार पूर्व परीक्षेचा निकाल अंतिम करेपर्यंत संबंधित विभागाकडून सुधारित, अतिरिक्त किंवा नवीन संवर्गाच्या मागणीपत्रानुसार उपलब्ध होणारी पदे पूर्व परीक्षेच्या निकालासाठी विचारात घेतली जातील, असे नमूद करण्यात आले आहे.

नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 01 जून 2022

अधिकृत संकेतस्थळ : https://mpsconline.gov.in/candidate

जाहिरात (MPSC Prelims Exam 2022 Notification) पाहण्यासाठी :  येथे क्लीक करा

ऑनलाईन (MPSC Prelims Exam 2022 Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा


सलग दोनवेळा *उप जिल्हाधिकारी* पद मिळवणाऱ्या आणि 2019 साली महाराष्ट्रात *मुलींमध्ये प्रथम* आलेल्या *पर्वणी पाटील मॅडम* यांनी सांगितलेली बुकलिस्ट


सरकारी जॉब संधी –

1 Comment
  1. Nagesh yamalwad says

    Sir mpsc exam 2nd year chalu asnare students devu shaknat

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.