कोणत्याही स्पर्धा परीक्षेत आपल्या हक्काचे आणि हातातील मार्क्स म्हणजे चालू घडामोडी. पण यासाठी हवी ती प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि फक्त प्रॅक्टिस. अनेक टॉपर्सच्या सांगण्यानुसार चालू घडामोडीचे जास्तीतजास्त मार्क्स मिळवण्यासाठी दररोज MCQ सोडवणे अधिक फायद्याचे आहे. ही गरज लक्षात घेऊन MPSC360.com आपल्यासाठी दररोजचा चालूघडामोडी प्रश्नसंच घेऊन आले आहे.
यातील प्रश्न Loksatta, Indian Express, The Hindu आणि इतर चालू घडामोडी स्रोतातून तयार केले गेले आहेत. यामुळे तुम्ही वाचत असलेल्या विषयाचा पाया भक्कम करण्यासोबतच तुमचे Static Fact सुद्धा सुधारण्यास मदत होईल.
MPSC Daily Quiz – 01 October 2020
Quiz-summary
0 of 10 questions completed
Questions:
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
Information
चा परिपूर्ण फायदा घेण्यासाठी, या सूचनांचे अनुसरण करा:
‘Start Quiz’ या बटनावर क्लीक करा.
Current Affairs Quiz सोडावा
खात्री झाल्यावर, सबमिट करण्यासाठी ‘Finish Quiz’ बटनावर क्लीक करा.
‘View Questions’ वर क्लिक केल्यावर तुम्हाला तुमचे प्रश्न आणि उत्तरे दिसतील.
You have already completed the quiz before. Hence you can not start it again.
Quiz is loading...
You must sign in or sign up to start the quiz.
You have to finish following quiz, to start this quiz:
Results
0 of 10 questions answered correctly
Your time:
Time has elapsed
You have reached 0 of 0 points, (0)
Average score | |
Your score |
Categories
- Not categorized 0%
Pos. | Name | Entered on | Points | Result |
---|---|---|---|---|
Table is loading | ||||
No data available | ||||
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- 10
- Answered
- Review
- Question 1 of 10
1. Question
2 pointsकोणत्या देशासोबत भारताने 26 सप्टेंबर रोजी बौद्धिक संपदा सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करार केला?
Correct26 सप्टेंबर 2020 रोजी भारताने डेन्मार्क देशासोबत बौद्धिक संपदा सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करार केला.
Incorrect26 सप्टेंबर 2020 रोजी भारताने डेन्मार्क देशासोबत बौद्धिक संपदा सहकार्याच्या क्षेत्रात सामंजस्य करार केला.
- Question 2 of 10
2. Question
2 pointsकोणत्या अंतराळ संस्थेच्यावतीने सोनिफिकेशन प्रकल्प जाहीर करण्यात आला आहे?
Correctसोनिफिकेशन प्रकल्प हा अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेचा उपक्रम आहे, ज्याच्या अंतर्गत खगोलीय प्रतिमांना संगीताच्या रूपात रूपांतरित केले जात आहे. अश्या स्वरूपातली माहिती विश्लेषणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरल्याचे दिसून आले आहे.
Incorrectसोनिफिकेशन प्रकल्प हा अमेरिकेच्या नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) या संस्थेचा उपक्रम आहे, ज्याच्या अंतर्गत खगोलीय प्रतिमांना संगीताच्या रूपात रूपांतरित केले जात आहे. अश्या स्वरूपातली माहिती विश्लेषणाच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त ठरल्याचे दिसून आले आहे.
- Question 3 of 10
3. Question
2 pointsकोणत्या घटकाला आळा घालण्यासाठी शास्त्रज्ञांनी पुसा डीकंपोजर्स यंत्र तयार केले?
Correctपीक निघल्यानंतर मागे राहिलेल्या तणांचा पेंढा जाळण्याच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी शास्त्रज्ञांनी पुसा डीकंपोजर्स यंत्र तयार केले आहे. हे जैवअपघटन करणारे तंत्र असून, त्यात नेहमीच्या तुलनेत जास्त वेगाने अपघटन होण्यास मदत करणाऱ्या बुरशीचा वापर केला गेला आहे
Incorrectपीक निघल्यानंतर मागे राहिलेल्या तणांचा पेंढा जाळण्याच्या पद्धतीला आळा घालण्यासाठी शास्त्रज्ञांनी पुसा डीकंपोजर्स यंत्र तयार केले आहे. हे जैवअपघटन करणारे तंत्र असून, त्यात नेहमीच्या तुलनेत जास्त वेगाने अपघटन होण्यास मदत करणाऱ्या बुरशीचा वापर केला गेला आहे
- Question 4 of 10
4. Question
2 pointsखालीलपैकी कोणती सामाजिक हितार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने असलेली एक आभासी महाशिखर परिषद आहे?
Correctसामाजिक हितार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत एक आभासी महाशिखर परिषद आयोजित केली जाणार आहे, जिचे नाव आहे RAISE 2020 (सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता 2020). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. भारत सरकारचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. AI तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक परिवर्तन, समावेश आणि सशक्तीकरणासाठी भारताची कल्पना आणि रूपरेषा तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर जगभरातल्या विचारवंतांची ही अशा प्रकारची पहिलीच बैठक आहे.
Incorrectसामाजिक हितार्थ कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने 5 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2020 या कालावधीत एक आभासी महाशिखर परिषद आयोजित केली जाणार आहे, जिचे नाव आहे RAISE 2020 (सामाजिक सशक्तीकरणासाठी जबाबदार कृत्रिम बुद्धिमत्ता 2020). पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. भारत सरकारचे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि नीती आयोग यांच्यावतीने हा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. AI तंत्रज्ञानाद्वारे सामाजिक परिवर्तन, समावेश आणि सशक्तीकरणासाठी भारताची कल्पना आणि रूपरेषा तयार करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर जगभरातल्या विचारवंतांची ही अशा प्रकारची पहिलीच बैठक आहे.
- Question 5 of 10
5. Question
2 pointsकोणत्या राज्यात मुख्यमंत्री ग्राम्य परिवहन अचोनी योजना लागू करण्यात आली?
Correctआसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते राज्य परिवहन विभागाची राज्यात मुख्यमंत्री ग्राम्य परिवहन अचोनी योजना याचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या सर्व खेड्यांपर्यंत हलक्या मोटार वाहवांची सेवा आरंभ करण्यास अनुमती देण्यात आली आहे, ज्यामार्फत ग्रामीण संपर्क सुधारता येणार. प्रत्येक गावात एका लाभार्थ्याला एक वाहन दिले जाणार आहे.
Incorrectआसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते राज्य परिवहन विभागाची राज्यात मुख्यमंत्री ग्राम्य परिवहन अचोनी योजना याचा शुभारंभ करण्यात आला आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातल्या सर्व खेड्यांपर्यंत हलक्या मोटार वाहवांची सेवा आरंभ करण्यास अनुमती देण्यात आली आहे, ज्यामार्फत ग्रामीण संपर्क सुधारता येणार. प्रत्येक गावात एका लाभार्थ्याला एक वाहन दिले जाणार आहे.
- Question 6 of 10
6. Question
2 pointsकोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रे निर्मूलन दिन साजरा करतात?
Correctदरवर्षी 26 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रे निर्मूलन दिन साजरा करतात.
Incorrectदरवर्षी 26 सप्टेंबर या दिवशी आंतरराष्ट्रीय अण्वस्त्रे निर्मूलन दिन साजरा करतात.
- Question 7 of 10
7. Question
2 pointsकोणत्या व्यक्तीचा 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला?
Correctज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. पुरस्कारस्वरूप प्रमाणपत्र, वाग्देवीची प्रतिमा आणि अकरा लक्ष रुपयांचा धनादेश दिला जातो. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो.
Incorrectज्ञानपीठ पुरस्कार हा भारतीय साहित्य जगतातला सर्वश्रेष्ठ पुरस्कार समजला जातो. पुरस्कारस्वरूप प्रमाणपत्र, वाग्देवीची प्रतिमा आणि अकरा लक्ष रुपयांचा धनादेश दिला जातो. भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीत नमूद केलेल्या बावीस भाषांपैकी कोणत्याही भाषेत लेखन करणाऱ्या एका नागरिकाला दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येतो. प्रकाशित होऊन कमीतकमी पाच वर्षे झालेल्या पुस्तकांचाच पुरस्कारासाठी विचार होतो.
- Question 8 of 10
8. Question
2 pointsकोणत्या बँकेनी सेफपे नामक संपर्क-रहीत डेबिट कार्डमार्फत देयकाची सुविधा तयार केली?
CorrectIDFC फर्स्ट बँकेनी सेफपे नामक संपर्क-रहीत डेबिट कार्डमार्फत देयकाची सुविधा तयार केली आहे.
IncorrectIDFC फर्स्ट बँकेनी सेफपे नामक संपर्क-रहीत डेबिट कार्डमार्फत देयकाची सुविधा तयार केली आहे.
- Question 9 of 10
9. Question
2 pointsकोणती संस्था भारतातल्या वैद्यकीय शिक्षणाची प्रमुख विनियमन संस्था आहे?
Correctभारतीय वैद्यकीय परिषद (MCI) याची जागा घेणारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) ही देशातले वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसायाची सर्वोच्च विनियमन संस्था म्हणून 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्त्वात आली. आयोगामध्ये एकूण 33 सदस्य असणार आहेत. डॉ. सुरेश चंद्र शर्मा हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष आहेत.
Incorrectभारतीय वैद्यकीय परिषद (MCI) याची जागा घेणारी राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) ही देशातले वैद्यकीय शिक्षण आणि व्यवसायाची सर्वोच्च विनियमन संस्था म्हणून 25 सप्टेंबर 2020 रोजी अस्तित्त्वात आली. आयोगामध्ये एकूण 33 सदस्य असणार आहेत. डॉ. सुरेश चंद्र शर्मा हे या संस्थेचे पहिले अध्यक्ष आहेत.
- Question 10 of 10
10. Question
2 pointsकोणते राज्य असंसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी यू.एन. इंटरएजन्सी टास्क फोर्स (UNIATF) पुरस्कारचे विजेता ठरले?
Correctकेरळ राज्य (भारत) हे असंसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या देण्यात आलेल्या वर्ष 2020 साठीच्या यू.एन. इंटरएजन्सी टास्क फोर्स (UNIATF) पुरस्कारचे विजेता ठरले.
Incorrectकेरळ राज्य (भारत) हे असंसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या देण्यात आलेल्या वर्ष 2020 साठीच्या यू.एन. इंटरएजन्सी टास्क फोर्स (UNIATF) पुरस्कारचे विजेता ठरले.