MHD Admit Card: महाराष्ट्र आरोग्य विभाग भरतीसाठी प्रवेशपत्र जारी

महाराष्ट्र आरोग्य विभागामध्ये (Maharashtra Health department recruitment 2021) तब्बल 3466 जागांसाठी होणाऱ्या मेगाभरतीसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत. ग्रुप C (Maharashtra health department group c recruitment 2021) आणि ग्रुप D (Maharashtra health department group D recruitment 2021) या पदांच्या परीक्षेसाठीचे हे प्रवेशपत्र (Maharashtra Health department recruitment 2021 admit card) जारी करण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांना यासाठी ऑनलाईन पद्धतीनं (How to download admit card for Maharashtra Health department recruitment) अप्लाय करावं लागणार होतं. त्यानुसार आता या परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी करण्यात आले आहेत.

महाराष्ट्र आरोग्य विभागात गट-ड  (Group-D) च्या एकूण जागा 3466 जागांसाठी भरती होणार आहे. तसंच ग्रुप C च्या काही पदांसाठी ही भरती होणार आहे. दिनांक 22 ऑगस्ट 2021 या तारखेपर्यंत अर्ज करण्याची संधी उमेदवारांना देण्यात आली होती. त्यानुसार आता प्रवेशपत्रं जारी करण्यात आले आहेत.

उमेदवारांना आपले प्रवेशपत्रं महाराष्ट्र आरोग्य विभागाच्या  https://groupc.arogyabharti2021.in/ या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड करता येणार आहे. उमेदवारांना इथे आपला अप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करावा लागणार आहे त्यानंतर तुमचं प्रवेशपत्रं डाउनलोड करता येणार आहे.

असं करा MHD Admit Card डाउनलोड

सुरुवातीला ग्रुप C किंवा ग्रुप D LOG IN च्या लिंकवर क्लिक करा.

यानंतर तुमचा अप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा एंटर करा.

यानंतर तुम्हाला प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.

परीक्षेसाठी आपलं प्रवेशपत्र डाउनलोड करून ठेवा.

कधी होणार परीक्षा?

महाराष्ट्र आरोग्य विभाग ग्रुप C आणि ग्रुप D च्या जागांसाठी परीक्षा 25 आणि 26 सप्टेंबर 2021 रोजी (maharashtra health department recruitment 2021 exam date) घेण्यात येणार आहे. त्यासाठी उमेद्वारांनकडे प्रवेशपत्र असणं आवश्यक आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही परीक्षा घेण्यात येणार आहे.

इथून डाउनलोड करा तुमचं प्रवेशपत्र

महाराष्ट्र आरोग्य विभाग Group C परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्क्लिक करा.

महाराष्ट्र आरोग्य विभाग Group D परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी इथे क्क्लिक करा.


3 Comments
  1. Ajay Ananda Bhil says
  2. Ajay Ananda Bhil says

    Hii

  3. Saurabh Praghane says

    Yghvvg. Jchc

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole