फ्रेशर्स असाल तर हा गोल्डन चान्स सोडूच नका; थेट केंद्रीय मंत्रालयात 106 जागांसाठी होतेय मेगाभरती; करा अप्लाय

MEITY Bharti 2023
MEITY Bharti 2023 – इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. IT कार्यकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 जानेवारी 2023 असणार आहे.
या पदांसाठी भरती
IT कार्यकारी (IT Executive)
एकूण जागा – 106
CISF मध्ये विविध पदांच्या 451 जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना मिळेल 69,100 पगार
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
IT कार्यकारी (IT Executive) –
- या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार बी.एस्सी. संगणक विज्ञान/B.Sc. माहिती तंत्रज्ञान / बॅचलर इन कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (B.C.A) पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
- तसंच या पदभरतीसाठी वर्ष 2021 आणि 2022 चे पास आउट फ्रेशर्स उमेदवारही अर्ज करू शकणार आहेत.
- उमेदवारांनी या पदभरती सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगार
IT कार्यकारी (IT Executive) – 30,000/- रुपये प्रतिमहिना
आयकर विभागात विविध पदांची मोठी भरती ; 10वी ते ग्रॅज्युएट्ससाठी नोकरीची संधी..
ही कागदपत्रं आवश्यक
- Resume (बायोडेटा)
- दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
- ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
- पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख – 23 जानेवारी 2023
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://apps.bisag.co.in/adddetails या लिंकवर क्लिक करा.