WhatsApp वर कोणी तरी ब्लॉक केलंय? कळण्यासाठी वापरा ‘या’ WhatsApp Tricks

WhatsApp Tricks – व्हॉट्सअ‍ॅपचे आपल्या आयुष्यातील स्थान – सा.न. वि. वि. हे असलं काही कधी लिहिल्याचं आठवतंय, ज्यांनी शाळेत मराठी पत्रं लिहिली असतील त्यांना ते नक्की आठवेल कारण साष्टांग नमस्कार विनंती विशेष, ज्याला पत्राचा मायना म्हणायचे. आज पत्र वगैरे सगळं कालबाह्य झालं आहे. आता निरोप देण्यासाठी आपल्याला शक्य तेवढं जलद साधन हवं असतं… दिवसेंदिवस तंत्रज्ञान प्रगती करत आहे.

आधी केवळ फोन करणे, त्यानंतर मोबाईल, टेक्स्ट मेसेज (SMS) मग मल्टी मीडिया मेसेज (MMS) मग अशी बरीच तंत्रज्ञानाची स्थित्यंतरे पाहिल्यानंतर आलं स्मार्ट फोनचं युग त्याला साजेशी असणारी सगळी सुविधा म्हणून विविध अ‍ॅप्स आली, निरोप देण्यासाठी त्याच तातडीने सोबत आकर्षक अशी सुविधा असलेलं अ‍ॅप म्हणजे व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), त्यानं मोबाईलच्या माध्यमातून आपल्या आयुष्यात शिरकाव केला. आणि आज त्याच व्हॉट्सअ‍ॅपला आपल्या आयुष्यापासून आपण वेगळं नाहीच करू शकत…. पण या व्हॉट्सअ‍ॅपबद्दल आपल्याला सर्व काही माहीत आहे का? चटकन संपर्क व्हावा म्हणून जशी ही सुविधा आहे, तशी संपर्क कुणी करावा? कुणाला परवानगी नाही याचीही व्हॉट्सअ‍ॅपवर सुविधा आहे.

काही वेळा असंही एखाद्याला आपण काही message करायचा प्रयत्न करतो, पण उत्तर येत नाही आणि मेसेज करणारा इकडे वाट पाहत बसतो….. जर का एखादी नावडती संपर्क करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्या सुविधेनुसार त्या व्यक्तीला ब्लॉक (Block) केलं जातं…
आपल्याला कसं समजेल की आपल्याला कुणी ब्लॉक केलं आहे ते? त्यासाठीच या आहेत काही सोप्या युक्त्या ज्याच्या आधारे आपल्याला लगेच कळून येईल की कुणी केलं आहे आपल्याला ब्लॉक!

आपल्याला कोणी ब्लॉक केलंय का, याबद्दल माहिती करून घेण्यासाठीच्या वाचा काही सोप्या WhatsApp Tricks

१) ऑनलाईन स्टेटस दिसणार नाही.
आज काल लोक रोज नवीन स्टेटस (Status) टाकत असतात. गाणी असो की फोटो किंवा काही मजेशीर विडिओ (Funny Videos).
contact list मधल्या लोकांच्या स्टेटसची भली मोठी यादीच आलेली दिसते. आता ही लिस्ट बघण्याचा आता लोकांना छंदच जडला आहे.
म्हणून जर ज्या व्यक्तीचे स्टेटस त्याचा नंबर आपल्या मोबाईल मध्ये सेव्ह असूनही तुम्हाला दिसत नसेल तर समजून जा की तुम्हाला ब्लॉक करण्यात आलं आहे.

२)प्रोफाईल पिक्चर दिसत नाही.
स्मार्ट फोन (smart phone) हातात आल्यापासून आपण इतके फोटो काढत असतो, आणि यातले काही चांगले असलेले फोटो आपसूकच व्हॉट्सअ‍ॅपचं प्रोफाईल पिक्चर (Profile Picture) म्हणून लावले जातात. तर ज्यांनी आपल्याला ब्लॉक केलं आहे त्यांचं प्रोफाईल पिक्चर आपल्याला दिसत नाही. जेंव्हा पर्सनल चॅट वर गेल्यावर आपल्याला जुना एखादा फोटो दिसत असतो, नंतर तो ही दिसणं बंद होतं… म्हणजे त्या व्यक्तीनं आपल्याला ब्लॉक केलं आहे.

३)पाठवलेल्या मेसेजवर डबल व ब्लू टिक दिसणार नाही.
व्हॉट्सअ‍ॅप आपल्या आवडीचं का आहे की आपण कुणालाही झटकन मेसेज पाठवू शकतो. बरं त्या व्यक्तीला मेसेज गेला आहे का हे कळू शकतं कारण पाठवलेल्या मेसेजवर आपल्याला दोनदा बरोबर चिन्हाची खुण येते, ज्याला डबल टिक म्हणतात. बरं समोरच्या व्यक्तीनं तो वाचला आहे का हे आपल्याला त्या मेसेजवर आधीच असलेल्या डबल टिक निळ्या होतात यांवरून समजतं. जेंव्हा एखादी व्यक्ती आपल्याला ब्लॉक करते, तेंव्हा हे दोन्ही ही आपल्याला दिसत नाही.

४) व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप काढा.
आपण नातेवाईक, मित्र – मैत्रिणी, समविचारी लोकांचे ग्रुप काढतो किंवा त्यात अ‍ॅड होत असतो. जर तुम्हाला माहीत करुन घ्यायचं आहे की कुणी आपल्याला ब्लॉक केलं आहे, तर त्या व्यक्तीला घेऊन एखादा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप काढा आणि त्या व्यक्तीला त्या ग्रुपमध्ये अ‍ॅड करा. जर का त्या व्यक्तीने तुम्हाला ब्लॉक केलं आहे तर त्या ग्रुपमध्ये त्या व्यक्तीला तुम्ही अ‍ॅड नाही करू शकणार!

५) व्हॉट्सअ‍ॅप कॉल उचलला जाणारच नाही.
जसं व्हॉट्सअ‍ॅपला फोन कॉलचं feature आलं आहे तसा मोठ्या प्रमाणावर त्याचा वापर केला जातोच. पण आपल्याला ब्लॉक केलेल्या व्यक्तीला जर आपण व्हॉट्सअ‍ॅप कॉल लावला तरी आपला कॉल उचलला जाणार नाही.

या WhatsApp Tricks तुम्हालाही आवडल्या असतील तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.


1 Comment
  1. Yogesh says

    तुम्ही लय मागे आहे अजून…

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole