Highest Salary Jobs: लाखो रुपयांचा पगार देणाऱ्या नोकऱ्या कोणत्या? आता उत्तर जाणून घ्या

शालेय, महविद्यालयीन, पदवी असे शिक्षणाचे एकेक टप्पे पार केल्यानंतर वेध लागतात ते एक नोकरी (Job) मिळावी याचे. एक अशी नोकरी ज्यातून उत्तम पगार मिळेल आणि करियरची सुरुवात योग्य होईल. आपल्या देशात तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे.

त्याचबरोबर नवनवीन तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी सहज शक्य होत आहेत. याच तंत्रज्ञानाच्या आधारे नोकऱ्या मिळण्याचे प्रमाणही वाढत आहे. अशी क्षेत्रं आहेत ज्याद्वारे आपल्याला आपली भरघोस पगाराची अपेक्षा पूर्ण होऊ शकते. अशाच क्षेत्रांची माहिती जाणून घेऊयात.

कोणती आहेत ती क्षेत्रं?

आजकाल ज्या व्यक्तींचं योग्य शिक्षण झालं आहे, तसेच शिक्षणाबरोबरच त्यांच्याअंगी अन्य काही कुशलता आहे. या सगळ्या गोष्टींमुळे अशा व्यक्तींना झटपट व उत्तम पगाराच्या नोकरींच्या योग्य संधी उपलब्ध होत आहेत. ज्या संधी उपलब्ध होत आहेत, त्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स इंजिनीअर, फुलस्टॅक डेव्हलपर, सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करण्याची संधी मिळते आहे. वेतनही भरपूर मिळतं. कारण ही सर्व पदे आयटी क्षेत्रातील (IT Jobs) आहेत.

ज्या विद्यार्थ्यांनी कम्प्युटर सायन्स, सॉफ्टवेअर प्रोग्राम डिझाइन या विषयांची पदवी मिळवली असेल तर त्यांना सॉफ्टवेअर इंजिनीअर (Software engineer) म्हणून नोकरी मिळू शकते. सॉलिडिटी, क्लाउड टेक्नॉलॉजी आणि डेटाबेस मॅनेजमेंट हे तांत्रिक ज्ञान असणाऱ्या व्यक्तींना बँकिग तसेच कॉन्ट्रॅक्ट क्षेत्रात नोकरी मिळू शकते. सॉफ्टवेअर इंजिनीअर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीला १० लाखांपर्यत पगार मिळतो.

सध्या जगात डेव्हलपर्सची संख्या कोट्यावधींच्या घरात आहे. येत्या काही वर्षांमध्ये यांत अजून वाढ होणार आहे. ज्याला फ्रंट एंड आणि बॅक एंड प्रोग्रामिंगची (Programming) व्यवस्थित माहिती असते, तो फुल स्टॅक डेव्हलपर (Full Stack Developer) म्हणून काम करतो. कन्सेप्ट ते फायनल प्रॉडक्ट असं अ ते ज्ञ पर्यंतचं सखोल ज्ञान या व्यक्तीला असतं.  तो फुल स्टॅक डेव्हलपर म्हणून नोकरी करणाऱ्या व्यक्तीला साधारणपणे ८०-८५ लाख रुपये इतकं पॅकेज मिळतं. 

सध्याचं युग हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial Intelligence) चं आहे. प्रत्येक कंपनीमध्ये एआय कामाला येतोच. एआयचा सहभाग आहे, म्हटल्यावर त्याचा प्रोजेक्ट डेव्हलोप करणे, त्याचं व्यवस्थापन व त्याचबरोबर त्याची देखभाल करण्यासाठी एका व्यक्तीची आवश्यकता असते, त्याला एआय आर्किटेक्ट (AI Architect) असं म्हणतात.

परंतु इथे संधी मिळण्याकरता गणित आणि सांख्यिकी (Maths & Statistics) यांत तुम्ही प्रविणता असायला हवी. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे कॉम्पुटर लँग्वेजेस. तर टॉर्च (Torch),पायथॉन (Python) आणि आर (R)  या कॉम्पुटर लँग्वेजेसचं उत्तम ज्ञान हवं. एआय आर्किटेक्ट म्हणून कार्यरत असणाऱ्या व्यक्तीला ८५ – ८८ लाखाच्या घरात वार्षिक पगार मिळतो. 

डेव्हऑप्स इंजिनीअर (DevOps Engineer) या पदावर नोकरी करणाऱ्या व्यक्तींना या क्षेत्रातील सगळ्यात जास्त पगार मिळतो, असं सांगितलं जातं. स्क्रिप्टिंग (Scripting) आणि कोडिंगचं (Coding) ज्ञान असणाऱ्या व्यक्ती या डेव्हऑप्स इंजिनीअर बनू शकतात.

प्रोजेक्ट्स मधील सर्वात महत्वाची असणारी ऑपरेशन टीम ज्याचा एका भाग म्हणजे हा डेव्हऑप्स इंजिनीअर असू शकतो. त्याचा सहभाग हा डिप्लॉयमेंट (Deployment) आणि नेटवर्क ऑपरेशन (Network Operation) या विभागांमध्ये असतो म्हणून तो अ‍ॅप्लिकेशन डेव्हलमेंट च्या टीमचा ही भाग असू शकतो. याला कोटीच्या घरात पॅकेज मिळू शकतं. 


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole