पट्टचित्र (Pattachitra) – रघुराजपूरात जपली जात असलेली ओडिशाची सर्वात जुनी कला

ओडिशाची सर्वात जुन्या कलाप्रकारांपैकी एक असलेली पट्टचित्र (Pattachitra) ही चित्रकला रघुराजपूरा या खेड्यात जपण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे. या प्रयत्नांमुळे, रघुराजपूरा भारतातले पहिले वारसा गाव ठरते.

‘पट्टचित्र’ (Pattachitra) कलेविषयी

  • पट्टचित्र ही चित्रकला शैली ओडिशाच्या सर्वात जुन्या आणि लोकप्रिय कला प्रकारांपैकी एक आहे. ही कला इ.स.पू. 5 या काळापासून अस्तित्वात आहे.
  • पट्ट हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ तैलचित्र तयार करण्यासाठी चित्रकार वापरतात ते कापड (कॅनव्हास) असा होतो.
  • कापडावर चित्र तयार करण्यासाठी अनेक रंगांचा वापर केला जातो, ज्यात सामान्यत: पांढरा, लाल, पिवळा आणि काळा ही रंग असतात. चित्र काढण्यापूर्वी कापड एका प्रक्रियेमधून जाते, त्यासाठी पारंपारिक प्रक्रियेचा अवलंब केला जातो.
  • प्रथम, चुन्याची बारीक भुकटी आणि चिंचेच्या बियापासून बनवलेला गोंद यांचा लेप कापडावर लावून चित्रासाठी पृष्ठभुमी तयार केली जाते. चित्राची सीमा प्रथम पूर्ण करण्याची परंपरा आहे.
  • त्यानंतर कलाकार हलका लाल आणि पिवळा रंग वापरुन थेट ब्रशने एक खडबडीत रेखाकृती तयार करण्यास सुरवात करतो.
  • चित्र पूर्ण झाल्यानंतर ते कोळशाच्या आगीवर धरले जाते आणि पृष्ठभागावर रोगण लावले जाते. त्यामुळे चित्र जल-प्रतिरोधक आणि टिकाऊ बनते.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.