चीनचं पितळ उघडं पाडल्याने भारतीय वंशाच्या पत्रकाराचा पुलित्झर पुरस्काराने सन्मान

अमेरिकेतील कोलंबिया युनिव्हर्सिटी तर्फे उत्तम पत्रकारितेसाठी दिल्या जाणारा पुलित्झर पुरस्कारांची (Pulitzer Prize) नुकतीच घोषणा करण्यात आली. भारतीय वंशाच्या मेघा राजगोपालन यांनी हा पुरस्कार पटकावल्याने सगळीकडे त्यांचीच चर्चा सुरु आहे. पत्रकारितेत केलेल्या कामगिरी बद्दल त्यांना ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

कोणत्या कामगिरीकरिता देण्यात आला पुलित्झर पुरस्कार ?

मेघा राजगोपालन यांनी आपल्या पत्रकारितेतून चीनचं पितळ उघड पाडल्याने त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. रिएज्यूकेशन कॅम्पच्या नावाखाली चीनने उइगुर मुस्लिम आणि इतर काही अल्पसंख्यांकांना कैदेत ठेवले होते.

ह्या कॅम्प मधील काही लोकांची मेघा राजगोपालन (Megha Rajgopalan) यांनी मुलाखत घेतली. तसेच कझाकिस्तान मध्ये पळून आलेल्या लोकांना त्या जाऊन भेटल्या. तसेच सॅटेलाईटच्या मदतीने फोटो काढून त्यांनी ह्या सर्व गोष्टींची खात्री देखील करून घेतली.

चीन मध्ये जाऊन तिथल्या लोकांना भेटायचा त्यांचा प्रयत्न होता परंतु त्यांना परवानगी नाकारण्यात आली.

काय आहे पुलित्झर पुरस्कार ?

पत्रकारिता आणि साहित्य ह्या विषयांमध्ये मोठी कामगिरी केलेल्या लोकांना Pulitzer Prize हा पुरस्कार देण्यात येतो. १९१७ मध्ये सुरु करण्यात आलेल्या ह्या पुरस्काराला तब्बल १०० हून अधिक वर्ष पूर्ण झालीत आणि ह्याच कारणामुळे तो मोलाचा मानला जातो.

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole