IBPS मध्ये नोकरीची मोठी संधी; तब्बल 12 लाख रुपये मिळेल पगार

IBPS Research Associate Recruitment 2022

IBPS Research Associate Recruitment 2022 – सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक चांगली बातमी आहे. दी इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शन (IBPS) नं रिसर्च असोसिएट्सच्या पोस्टसाठी अर्ज करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे या जागेसाठी वार्षिक पॅकेज 12 लाख रुपये देण्यात येणार आहे. याबाबतचं वृत्त एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. इच्छुक उमेदवारांसाठी IBPS 2022 च्या भर्तीसंबंधी सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

IBPS च्या रिसर्च असोसिएट (Research Associate) या पदावर काम करण्यास इच्छुक असलेल्या पात्र उमेदवारांनी निवड प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी (Online Registration) करणं आवश्यक आहे. वरील जागेसाठी उमेदवारांनी त्यांचे ऑनलाईन अर्ज 31 मे 2022 किंवा त्यापूर्वी अधिकृत सूचनेद्वारे दाखल करणं गरजेचं आहे. सर्व उमेदवारांनी 1000 रुपये शुल्क भरणं आवश्यक आहे. परीक्षेची अंदाजे तारीख जून 2022 मधील असेल. अर्ज आणि कागदपत्रं जमा केल्यानंतर उमेदवारांची निवड होईल.

  • उमेदवाराने मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून मानसशास्त्र/ शिक्षण/ सायकॉलॉजिकल मेजरमेंट (Psychological Measurement)/ सायकोमेट्रिक्स मॅनेजमेंट (Psychometrics Management) (HR मध्ये स्पेशलायझेशन) या विषयांमधून 55 टक्क्यांसह पदव्युत्तर शिक्षण घेतलेलं असणं आवश्यक आहे.
  • शैक्षणिक संशोधन (Research)/ टेस्ट डेव्हलपेंट (Test Development) या विषयांत एक वर्षाच्या कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल.
  • कॉम्प्युटरचं ज्ञान (Operating Computer) असणं आवश्यक आहे.

ऑनलाईन परीक्षेचं स्वरुप 

Reasoning या विषयात 40 प्रश्नांसाठी 50 गुणांची परीक्षा होईल. त्यासाठी 35 मिनिटांचा वेळ असेल. Quantitative Aptitude, इंग्रजी भाषा या विषयांसाठी प्रत्येकी 40 प्रश्न असतील. हे पेपरही 50 मार्कांचे असतील आणि त्यासाठी 35 मिनिटांचा वेळ असेल. General Awareness या विषयासाठीही 50 गुण असतील. या विषयात 40 प्रश्नांसाठी 15 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. Professional Knowledge (Research Methodology, Statistics, Personnel Measurements, इ.) या विषयातही 40 प्रश्न विचारले जातील. त्यासाठी 30 मिनिटांचा वेळ असेल आणि 50 गुण असतील. म्हणजेच एकूण 150 मिनिटांची ही ऑनलाईन परीक्षा असेल. एकूण 200 प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी 250 गुण असतील.

इतका मिळेल पगार 

  • दरमहा 44,900 रुपये (वार्षिक CTC जवळपास 12 लाख रुपये)

निवड प्रक्रिया  (Selection Procedure)

  • ऑनलाईन परीक्षा
  • गट कार्यशाळा (ग्रुप एक्सरसाईज)
  • वैयक्तिक मुलाखत
  • या जागेसाठी उमेदवाराचं वय किमान 21 वर्षं आणि जास्तीतजास्त 30 वर्षं असावं. म्हणजेच उमेदवाराचा जन्म 2 मे 1995 पूर्वी आणि 1 मे 2001 नंतर झालेला नसावा.

कसा करा अर्ज 

उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी IBPS च्या अधिकृत वेबसाईटला (https://www.ibps.in/) भेट द्यावी, अन्य कोणत्याही प्रकारे अर्ज स्वीकारला जाणार नाही. रिसर्च असोसिएटची पोस्ट शोधण्यासाठी होम पेजवर अगदी वरच्या बाजूला जाऊन 11 मे 2022 ची जाहिरात शोधा त्यावर Click करा.

IBPS- Recruitment of Research Associate यावर क्लिक करा – 11 मे पासून नोंदणी सुरु झाली आहे.

नोंदणी करण्यासाठी इथे क्लिक करा.एक नवीन विंडो ओपन होईल.तेथे नवीन नोंदणीसाठी क्लिक करा.

सर्व आवश्यक ती माहिती भरा आणि फोटो व सही अपलोड करा.

तुम्ही भरलेली सर्व माहिती योग्य आहे ना, अर्जप्रक्रिया सांगितल्याप्रमाणेच केली आहे ना ते एकदा पूर्ण तपासून घ्या आणि 1000 रुपये फी भरा.त्यानंतर अर्ज तपासा आणि डाउनलोड करून घ्या आणि भविष्यातील उपयोगासाठी त्याची प्रिंटआउट काढा.

ऑब्जेक्टिव्ह टेस्ट, मानसिक आणि शैक्षणिक चाचण्या आणि अन्य निवडीचे निकष तसंच कम्प्युटरचं ज्ञान असलेल्यांना प्राधान्य दिलं जाईल.

सध्या असलेल्या रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची नियुक्ती केली जाईल. मात्र आवश्यकतेनुसार जागांसाठी वेटिंग लिस्टही तयार केली जाईल. ही सहा महिन्यांसाठी वैध असेल.

कामाचं स्वरुप आणि जबाबदारी 

Psychometrics/ Psychological measurement च्या क्षेत्रात ऑब्जेक्टिव्ह टाईप ॲप्टिट्यूड आणि अचिव्हमेंट टेस्ट विकसित करण्याची गरज कॉग्निटिव्ह ॲबिलिटी मोजण्यासाठी टेस्ट तयार करणे. प्रोजेक्ट सायकल अंतिम करण्यासाठी क्लाएंट संस्थांबरोबर चर्चा करणे, अंतर्गत विभागांमध्ये सहकार्यासाठी काम करणं हे अत्यंत आवश्यक आहे.


सरकारी जॉब संधी –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole