IBPS मार्फत क्लर्क पदांच्या 5858 जागांसाठी मेगा भरती, जाणून घ्या डिटेल्स

IBPS Clerk Recruitment 2021 – जर तुम्ही देशातील राष्ट्रीयकृत बँकांमध्ये लिपिक पदांसाठी सरकारी नोकरीसाठी इच्छुक असाल आणि बँक लिपिक भरती परीक्षेची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन (IBPS Clerk Recruitment 2021)ने क्लार्क पदांसाठी अर्ज प्रक्रिया पुन्हा एकदा सुरु केल्याची घोषणा केली आहे.

बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब अँड सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडिया यामध्ये एकूण  5858 लिपिक पदांसाठी भरती लवकर निघणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज सुरु होण्याची तारीख ७ ऑक्टोबर असून अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ ऑक्टोबर आहे.

एकूण जागा : ५८५८ (महाराष्ट्र ७९९)

पदाचे नाव : क्लार्क

शैक्षणिक पात्रता : इच्छुक उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयात पदवी उत्तीर्ण केलेली असावी.

वयाची अट :
– उमेदवाराचे वय १ सप्टेंबर २०२१ रोजी किमान २० वर्षे आणि जास्तीत जास्त २८ वर्षे असावे.

– उमेदवाराचा जन्म २ सप्टेंबर १९९२ पूर्वीचा नसावा आणि १ सप्टेंबर २००० नंतरचा असावा.

परीक्षा फी : 

– जनरल/ओबीसी करीत  परीक्षा शुल्क ८५० रुपये भरावे लागेल.
– SC/ST/PWD यांसाठी १७५ रुपये/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाईन

ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख : ७ ऑक्टोबर २०२१

अर्ज करण्याची शेवटची तारीख : २७ ऑक्टोबर २०२१

पूर्व परीक्षा : नोव्हेंबर 2021
प्रीलिम्स प्रवेशपत्र : नोव्हेंबर/डिसेंबर 2021
प्रीलिम्स परीक्षेची तारीख : डिसेंबर 2021

अधिकृत वेबसाइट : ibpsonline.ibps.in

जाहिरात (IBPS Clerk Notification 2021) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा 


आता घरबसल्या वरील परीक्षेची तयारी करा Unacademy वर
थेट एक्स्पर्ट करून शिका, तेही अगदी मोफत !


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.