IAS तुकाराम मुंडेंचा जिथे अपमान झाला, तिथंच सन्मानाचं निमंत्रण

IAS Tukaram Mundhe यांना नागपूर महानगरपालिकेत आयुक्त म्हणून काम करत असताना अपमानास्पद व्हावे लागले होते, त्याच महानगरपालिकेत आता त्यांना सन्मानाचं निमंत्रण मिळत आहे.

कोरोनामुळे आधीच गेल्या वर्षी पासून आपलं जीवन विस्कळीत झालं होतंच, आता दुसरी लाट आल्यावर तर अभूतपूर्व हाहाकार उडाला आहे. कशाचा कशाशी ताळमेळ राहिला नाही. सर्वच यंत्रणा कुचकामी ठरत आहेत. उत्तम व्यवस्थापन असणाऱ्या जबाबदार व्यक्तींची जनतेला व सरकारलाही गरज आहे. असंच जबाबदार नाव म्हणजे कर्तव्यदक्ष अधिकारी श्री. तुकाराम मुंडे (IAS Tukaram Mundhe)

मुंडेंची आठवण काढायचं काय कारण? अहो त्यांची न घाबरता, बेधडक आणि योग्य काम करण्याची पद्धत आहे म्हणून आणि ही आठवण आम्ही नाही काढत तर ज्या शहरातून त्यांची बदली झाली तिथल्या लोकप्रतिनिधींनी काढली आहे. तसंही त्यांच्या बदल्या झाल्या ती संख्या ही त्यांच्या कारकीर्दीची एकूण वर्षे याच्या संख्येपेक्षा जास्त आहे. पण नागपूरमधून झालेली त्यांची बदली हे प्रकरण प्रसारमध्यमांमध्ये गाजलं.

तर झालं असं की मुंडे (IAS Tukaram Mundhe) हे मागच्या काही दिवसांपूर्वी नागपूर महापालिकेचे आयुक्त म्हणून काम पाहत होते. पण महापालिकेतल्या सत्ताधारी पक्षाचे जे नेते होते त्यांना मुंडेंच्या या बेधडक कार्यपद्धतीचा त्रास होऊ लागला व त्यांनी मुंडेंवर एकदा भर सभागृहातच आरोप प्रत्यारोप केले, श्री. तुकाराम मुंडे व नागपूर महापालिकेचे सत्ताधारी यांचा हा वादंग चांगलाच गाजला. यांवर मुंडेंनी या लोकप्रतिनिधींना थेट इशारा दिला की आता गोंधळ थांबवला नाही तर ते सभागृह सोडून निघून जातील. यांवर नगरसेवक लोकांनी सभागृहच काय तर नागपूर सोडून जायला सांगितलं. बर सर्वपक्षीय नगरसेवकांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा होता.

राजकीय धिंगाण्याचा मुंडेंना खूप त्रास झाला, मुंडे रागाने तिथून निघून गेले. पण आता सध्या चालू असलेलं कोरोनाचं थैमान पाहता तिथल्याच एका विरोधी पक्षाच्या नगरसेवकाने नुकताच गोंधळ घातला व नागपूरची परिस्थिती सुधारण्यासाठी तुकाराम मुंडेच हवेत व त्यांना परत बोलावण्यात यावं अशी मागणी केली.

जनतेच्या हितासाठी निस्पृहपणे काम करणं, कर्तव्यकठोरता ठेवून कधीही न डगमगणं, कुणालाही न घाबरता बेधडक निर्णय घेणं ही आदर्श प्रशासकीय अधिकाऱ्याची गुणवैशिष्ट्ये मुंडेंकडे आहेत म्हणून उशीरा का होईना त्यांचं महत्व लक्षात आलं म्हणायचं, पण आपल्याकडे लोकांचं महत्व ते समोर असताना नाहीतर त्यांच्या अनुपस्थितीत लक्षात येतं हे दुदैवाची गोष्ट आहे.


हे वाचलंत का ? –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole