देशातील एकमेव जिल्हा, जिथे ना ऑक्सिजनचा तुटवडा, ना बेडची कमतरता

IAS Rajendra Bharud यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार हा जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत आत्मनिर्भर झाला आहे. जगात कोरोनामुळे हाहाकार उडाला असताना नंदुरबार मध्ये काहीच फरक पडत नाही आहे.

सध्या कोरोनाची दुसरी लाट देशात हाहाकार माजवत आहे, पूर्ण जन जीवन विस्कळीत झालं आहे. आरोग्य व्यवस्थेवर पुन्हा एकदा जोरदार ताण आला आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण आणि यंत्रणा पर्यायाने देशच व्हेंटिलेटरवर आहे. एकदम वाढलेल्या रुग्णसंख्येमुळे व्यवस्थेचा बोजवारा उडाला. लोकांचे जीव वाचवणं हा सर्वात मोठं आव्हान आहे. पण हे सगळं एका बाजूला चालू असतानाही एका ठिकाणी काहीच फरक पडत नाही आहे.

इथल्या लोकांना बाकी देशाला असलेले प्रश्न नाही भेडसावत आहेत, तर कोणतं ठिकाण किंवा गाव आहे ते? चला बघुयात,

आपण बोलतोय ते नंदुरबारबद्दल. खरंतर नंदुरबार म्हणजे महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा म्हणून परिचित आहे. मग अशी ओळख असतानाही इथं आरोग्याचा हा प्रश्न सुटला कसा? इथं ऑक्सिजन, रेमडेसीवीर वगैरे यांची कमतरता नाही भासली, कसं काय? याच सगळं श्रेय जातं ते एकाच व्यक्तीला, डॉ. श्री. राजेंद्र भारुड, जिल्हाधिकारी, नंदुरबार. जेंव्हा कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात जिल्ह्यात बेड्सची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याइतकी होती, पण आता ती संख्या १३०० च्या घरात आहे. ग्रामीण रुग्णालयात ५६०० पेक्षा जास्त बेड्स आहेत. आयसीयू बेड्स १३०० पेक्षा जास्त आहेत. ऑक्सिजन तयार करण्याचं प्रमाणही या जिल्ह्यात जास्त आहे. ३ हजार लिटर/ मिनिट इतका ऑक्सिजन इथं तयार होतो. म्हणजे हा जिल्हा ऑक्सिजन निर्मितीत आत्मनिर्भर झाला आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड (IAS Rajendra Bharud) हे २०१३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी. त्यांनी मुंबईच्या केईएम् रुग्णालयातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यामुळे कोरोना आणि दुसरी लाट याबद्दल ते आधीपासूनच जागरूक व सतर्क होते. दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी योग्य व चोख व्यवस्थापन करण्याची सुरुवात त्यांनी २०२० च्या अखेरपासूनच केली होती. त्यांच्या सतर्कतेबद्दल, चोख व्यवस्थापनाबद्दल त्यांचं खूप कौतुक होत आहे. राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनीही याबद्दल त्यांची पाठ थोपटली आहे.

अभ्यास करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून यशवंताच्या कहाण्या मिळतात, पण अधिकारी बनून कारकीर्द चमकवण्यासाठी त्याचबरोबर सामान्य लोकांना आपल्या दैनंदिन आयुष्यातही अशा केसस्टडीचा उपयोग नक्की होईल.


SOLVE Daily MPSC Quiz

DOWNLOADMPSC Question Papers [ALL]

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole