भारतातील ग्रॅज्युएट्सना लागणार जॉबची बंपर लॉटरी; Google आणि Wipro करणार मोठी भरती; करा अप्लाय

अमेरिकेमध्ये आर्थिकमंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. या सर्व कंपन्यांचा आयटी क्षेत्राशी फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे भारतीय आयटीक्षेत्रावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरीही भारतीय आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे. आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे. टेक जायंट गुगल आणि विप्रोनं नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपर्सची नेमणूक सुरू केली आहे. त्यामुळे ज्यांचं या दोन दिग्गज कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचं स्वप्न आहे, ते पूर्ण करण्याची संधी मिळत आहे. ‘टेक गिग’नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गुगलमध्ये नोकरी मिळवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना पुढील जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील:
1. सिस्टिम किंवा प्रॉडक्ट कोडिंग डेव्हलपमेंट करणं.
2. स्टेक होल्डर्स आणि पीर्ससह डिझाइन मूल्यांकनाद्वारे तंत्रज्ञानाची निवड करणं.
3. सर्वोत्तम प्रॉडक्ट डेव्हलप व्हावं यासाठी इतर डेव्हलपर्सच्या कोडिंगमध्ये योगदान देणं. (उदाहरणार्थ- स्टाईल गाइडलाईन्स, कोड इन चेकिंग, अॅक्युरसी, टेस्टॅबिलिटी आणि एफिशिअन्सी)
4. प्रोग्रॅम/प्रॉडक्ट अपडेट्स आणि वापरकर्त्यांच्या अभिप्रायाला प्रतिसाद म्हणून सूचना सामग्री आणि डॉक्युमेंटेशन अपडेट करणं
नोकरीसाठी आवश्यक निकष
1. बॅचलर डिग्री किंवा तुलनात्मक कामाचा अनुभव.
2. जावा, जावा स्क्रिप्ट, सी, किंवा पायथॉन लँग्वेजमध्ये सॉफ्टवेअर तयार करण्याचा एक वर्षाचा अनुभव.
गुगल व्यतिरिक्त, टायटन आणि विप्रोसारख्या कंपन्या कॉम्प्युटर प्रोफेशनल्स आणि पदवीधरांना कामावर घेत आहेत. विप्रो भारतभर विविध पदांसाठी तंत्रज्ञांची भरती करत आहे. चेन्नईमध्ये, विप्रो सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपर्सच्या शोधात आहे.
सीनिअर सॉफ्टवेअर डेव्हलपरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
1. प्रोजेक्ट प्लॅन आणि कस्टमर स्पेसिफिकेशन्सनुसार योग्य मॉडेल्स तयार करण्यासाठी CAD आणि CAE सारखे विविध सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरणं.
2. सॉफ्टवेअर-जनरेटेड डिझाइन आणि प्रोटोटाइपचं टेस्टिंग करणं आणि सर्व बाउंड्री कंडिशन्स पडताळून बघणं.(इम्पॅक्ट अॅनालिसिस, स्ट्रेस अॅनालिसिस इत्यादी)
3. स्पेसिफिकेशन्स तयार करणं आणि संपूर्ण कार्यक्षम सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचे भाग एकत्र करून ऑपरेशनच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणं.
नवीन वर्ष नवी मेगाभरती; राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी ओपनिंग्स; पात्रता फक्त 12वी
4. इंजिनीअरिंग ड्रॉईंग्जच्या माध्यमातून प्रोटोटाईप आणि मॉडेल तयार करणं.
5. कोणत्याही नवीन क्लायंटच्या आवश्यकतांसाठी फेल्युअर इफेक्ट मोड अॅनालिसिस (FMEA) आयोजित करणं.
6. व्हर्च्युअल सेटिंगमध्ये सिम्युलेशन आयोजित करून, क्लायंटला ऑप्टिमाइझ केलेले सोल्युशन्स पुरवणं.
विप्रो आपल्या हैदराबाद येथील ऑफिससाठी सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच्या शोधात आहे. सॉफ्टवेअर इंजिनीअरपदाच्या भूमिका आणि जबाबदाऱ्या:
1. प्रोजेक्ट प्लॅन आणि कस्टमर स्पेसिफिकेशन्सनुसार योग्य मॉडेल्स तयार करण्यासाठी CAD आणि CAE सारखं विविध सॉफ्टवेअर प्रोग्रॅम वापरणं.
2. सॉफ्टवेअर-जनरेटेड डिझाइन आणि प्रोटोटाइपची टेस्टिंग करणं आणि सर्व बाउंड्री कंडिशन्स पडताळून बघणं.(इम्पॅक्ट अॅनालिसिस, स्ट्रेस अॅनालिसिस इत्यादी)
3. स्पेसिफिकेशन्स तयार करणं आणि संपूर्ण कार्यक्षम सॉफ्टवेअर सिस्टम तयार करण्यासाठी सॉफ्टवेअरचे भाग एकत्र करून ऑपरेशनच्या व्यवहार्यतेचे मूल्यांकन करणं.
4. इंजिनिअरिंग ड्रॉईंग्जच्या माध्यमातून प्रोटोटाईप आणि मॉडेल तयार करणं.
5. कोणत्याही नवीन क्लायंटच्या आवश्यकतांसाठी फेल्युअर इफेक्ट मोड अॅनालिसिस (FMEA) आयोजित करणं.
6. ओपन इश्युजचं निराकरण करत असताना कोणत्याही सॉफ्टवेअर इंटिग्रेशन टीम किंवा क्लायंटनं रिपोर्ट केलेल्या समस्या दूर करणं.
7. क्लायंटसाठी सॉफ्टवेअर व्हेरिफिकेशन गुणवत्ता नियंत्रण पद्धती आणि योजना तयार करणं.
8. थोड्या उशीरानं पण जास्तीत जास्त परिणामकारकतेसह ऑन-टाईम ट्रबलशुटिंग, डीबगिंग आणि सिस्टिम अपग्रेड करणं.
Sir job