मानसिक आणि शारीरिक स्वास्थ नीट राखण्यासाठी ध्यानात असावीत अशी उपयोगी सूत्रे  …

मनुष्याला धन, बुद्धी याचबरोबर आरोग्याच्या संपदेचीही गरज असते. शरीराचं आणि मनाचं आरोग्य असे त्याचे दोन प्रकार आहेत. शरीराला आरोग्यवान बनवायचं असेल तर व्यायामाचे विविध प्रकार तसेच आहारात ठराविकच पदार्थ प्रमाणात खाणे या गोष्टी येतात. पण इतक्यावरच सगळं संपत नाही. तत्वज्ञानाच्या, योगशास्त्राच्या, आयुर्वेदाच्या या भारतीय परंपरेनुसार आरोग्याच्या विषयात चार बाबी अतिशय महत्वाच्या आहेत. मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी त्या समजून घ्यायला हव्यात. ( Four important things for physical and mental health)

. आचार –

या शब्दाचा अर्थ आहे की आपलं आचरण (Behavior) काय आहे? आपण कसे वागतो? 

– आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी कसे वागतो?

– आपण समाजात वावरत असताना आपली वर्तणूक कशी आहे? सामाजिक भान ठेवून आपण वावरतो का? 

– हे सगळ्यात महत्वाचं आहे की आपण स्वतःबरोबर कसे वागतो? आपल्याला आपली मदत करता येते का? 

२. विचार

‘विचार (Thoughts) जीवन घडवतात’ अशा वाक्यांवरून विचारांचं महत्व लक्षात येतं. आपण विचाराविना अगदीच कमी काळ राहू शकतो. आपण कशा प्रकारचे विचार करतो? आपल्या मनात जे विचार येतात, ते आपण त्याचं नीट निरीक्षण केलं आहे का? आपले विचार आपल्या आधीन आहेत का? आपल्या विचारांनी आपली मनस्थिती बिघडते की सुधारते? याचा सर्वतोपरी ‘विचार’ करणंच गरजेचं आहे.

३. आहार – 

वायू, द्रव आणि घन अशा पदार्थाच्या तीन अवस्था असतात. या तीनही अवस्थांमधील पदार्थांचे सेवन करणे यालाच आहार (Diet) समजलं जातं. जसे अन्नपदार्थ आपल्याला आवश्यक आहेत, तशी श्वसनासाठी वायुचीही आवश्यकता आहे. सर्व पोषणमुल्यांनी युक्त असा सकस आहार आपल्याला जीवन जगण्याला उपयोगी आहे, तसेच प्राणवायुयुक्त हवा ही आहे.

प्रमाणबद्ध आहार – आहाराचं प्रमाण योग्य असावं. आपलं अर्धं पोट हे नेहमी अन्नपदार्थांनी भरावं. उरलेल्या भागापैकी अर्ध्या भागात पाण्याचा वाटा आहे. बाकी पोट रिकामं असावं.

हवा – आपल्याला शुद्ध हवेतून ऑक्सिजन मिळायला हवा. म्हणून मोकळ्या हवेत जायला हवं. प्राणायामही करायला हवा. 

४. विहार

आपण जेव्हा महत्वाच्या कामात नसतो तेव्हा आपण काय करतो, यालाच विहार म्हणतात. आपण दिवसभर आपल्या कामात व्यस्त असतोच. परंतु ही महत्वाची कामं उरकल्यानंतर आपण काय करतो? मोकळ्या वेळेचा काही सदुपयोग करतो का? कशाप्रकारे करतो? मुळात मोकळा वेळ आपण काढण्यासाठी काही करतो का? या वेळेचा वापर करून आपल्याला पुन्हा काम करण्यासाठी मनाला उत्साहित केलं गेलं आहे का? याची उत्तरं मिळाली तरच ही बाब नीट कळेल.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole