Facebook वर आपल्या मित्रांपासूनही लपवता येणार आपली पोस्ट; नवे फीचर पाहून युजर्स झाले खुश

आपल्या सर्वांच्याच आयुष्यात इंटरनेटने फार महत्त्वाची जागा पटकावली आहे. त्यातही आपल्यापैकी बरेच जण सोशल मीडियावर जास्त वेळ घालवतात. आपल्याकडे व्हॉटस् अप, फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्राम, टेलिग्राम असे काही लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स आहेत. त्यातही फेसबुक हा अधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म आहे.

खूप लोक त्यावर पोस्ट करतात, चर्चा करतात, काही वेळा ट्रोलिंगही होते. बऱ्याचदा काही पोस्ट सर्वांनी वाचायला हव्या असे पोस्टकर्त्याला वाटत नसते तेव्हा काही सेटिंग्ज बदलावी लागतात. पण एखादी पोस्ट काही विशिष्ट लोकांनी वाचू नये म्हणून त्यांच्यापासून ती हाईड करण्याचा वाव नव्हता. पण आता ती देखील सोय फेसबुकवर मिळणार आहे.

फेसबुक काय किंवा इतर कोणतीही अँप ही सातत्याने अपडेट होत असतात. त्यातून सुरक्षा, नवे फिचर यांच्यासह अनेक गोष्टींचा समावेश असतो. फेसबुकमध्येही नवे फीचर अँड होणार आहे.

फेसबुकच्या कंपनीने म्हणजे मेटाने या विषयीची माहिती एका ब्लॉग पोस्ट मधून दिली आहे. यामध्ये एखादी पोस्ट आपल्याला विशिष्ट लोकांपासून हाईड करता येऊ शकते. त्यासाठी वेगळे सेटिंग्ज असतील. कॉमन सेटिंग्जचा वापर करावा लागणार नाही. मेटाने दिलेल्या माहिती नुसार वापरकर्त्यांची प्रायव्हसी पॉलिसी यात अपडेट केली आहे.

नेमका काय बदल आहे ?

ज्याला पुर्वी डेटा पॉलिसी म्हटले जाई. त्याविषयीचे नोटिफिकेशन मेटाकडून फेसबुक युझर्सला पाठवली जात आहेत. ही प्रायव्हसी पॉलिसी वापरकर्त्यांच्या फीडबॅकवर आधारित अपडेट करण्यात आली आहे. त्यात या नव्या फीचर चा समावेश आहे. या मुळे वापरकर्ते त्यांच्या फेसबुक पोस्ट अधिक चांगल्या रितीने मॅनेज करू शकतात. म्हणजे पोस्ट केल्यानंतर कोणी ती पाहू नये असे वाटते ते निवडू शकतात.

त्यासाठी फेसबुक उघडून स्क्रीनच्या उजव्या बाजूला दिलेला पर्याय निवडायचा. सेटिंग्ज वर क्लिक केले की प्रायव्हसी पर्यायावर जावे आणि नंतर अँक्टिव्हिटी फीड वर जाऊन तिथे हू कॅन सी यूअर फ्युचर पोस्ट म्हणजेच भविष्यातील तुमच्या पोस्ट कोण पाहू शकते, या प्रश्नावर क्लिक करून तिथे एडिट या पर्यायावर क्लिक करून निवड करू शकता.

हे आहेत फायदे –

या फीचरमुळे वापरकर्त्यांना एक उत्तम पर्याय मिळणार आहे कारण त्यामुळे पोस्टवर विनाकारण केली जाणारी टीका टिप्पणी किंवा ट्रोलिंग टाळता येऊ शकते. वैयक्तिक शेरेबाजी, खालच्या पातळीच्या भाषेचा वापर आपल्या पोस्टवर होऊ नये म्हणून याचा फायदा होईल. किंवा एखाद्या व्यक्तीविषयी, मित्राविषयी काही लिहिले तर ते त्याला कळू नये म्हणूनही याचा वापर वापरकर्त्यांना करता येऊ शकेल. एकूणच उपयुक्त ठरणारे असे फीचर लवकर सर्वांना वापरायला मिळेल.


हे हि वाचा –

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole