बसून काम करता? पाठीचं दुखणं आहे का? त्यावर इलाज असलेले हे उत्तम उपाय..

खाजगी असो की सरकारी; नोकरी म्हणलं की दिवसाचे १०-११ तास त्यात जातात. ऑफिसात खुर्चीवर बसून कॉम्प्युटरवर बसून काम करणाऱ्या बहुतांश व्यक्ती असतात. छानशी खुर्ची – टेबल असते तरीही बसून काम करणाऱ्या व्यक्तींना पाठीचं दुखणं सुरू होतं. याचं कारण म्हणजे ज्या प्रकारे या व्यक्ती खुर्चीवर बसतात, ती पद्धत चुकीची ठरते.  कदाचित त्यामुळेच पाठीच्या वेदना सुरू होतात. बऱ्याच जण समोर असलेल्या टेबलावर हात ठेवून पुढे झुकतात. यामुळे पाठीचे स्नायू मणक्यावर ताण येतो. म्हणूनही पाठदुखी होऊ शकते. रोजच्या चुकीच्या बसण्याच्या पद्धतीने हे दुखणं वाढतं जातं. वेदना असह्य होतात.

सततच्या वेदनांपासून सुटका कशी होईल याची सुटका कशी होईल हे कळतच नाही. व्यायाम करावा इतका मोकळा वेळ मिळेलच असं नाही. मग हाडवैद्य गाठावा लागतो. मग घ्या औषधं – गोळ्या. यापेक्षा एकदम सहज जमतील असे काही व्यायाम प्रकार केले तर विना औषधाचा आराम मिळेल. कणा, कंबर, पाठ हे फार महत्वाचे अवयव आहेत. म्हणूनच यांना स्वस्थता मिळावी म्हणून आपण काही वेळ खर्च करून हे छोटे व्यायाम करणं गरजेचं आहे. (Exercises for relief of back pain)

१. स्पायनल स्ट्रेच 

ताठ कणा या शब्दावरून आपल्याला लक्षात येतंचं की कण्याचं महत्व खूप आहे. विनाकणा काही करणं सोपं नसतं. कोणत्याही अवयवाला ताण दिला तर त्याच्यामध्ये असणाऱ्या स्नायूंना अजून कार्यक्षम करण्यासाठी जास्त उपयोग होतो. सकाळी किंवा रात्री कधीही जरी आपण स्ट्रेचिंग केलं तरी खूप लाभ होऊ शकतो. म्हणून आपण सुप्त वज्रासन करायला हवं. वज्रासन करण्याची पद्धत सर्वांनाच माहित आहे. पण यापुढे जाऊन वज्रासन करून झाल्यावर त्याच स्थितीत कंबरेतून पुढं झुकून डोकं टेकवावं आणि दोन्ही हात ताठ ठेवून पुढं ताणण्याचा जास्त प्रयत्न करावा. यामुळे हात, कंबर, पाठ, कणा यांचे स्नायू ताणले जाऊन वेदना कमी होतात.  

२. पवनमुक्तासन

पाठ टेकून झोपावं. मग आपले दोन्ही पाय गुडघ्यात वाकून पायाचा खालचा भाग हा जमिनीला समांतर ठेवावा. आता दोन्ही हात गुडघ्यावर ठेवावेत. गुद्ग्यांवर दाब देऊन ते पोटाकडे ओढावेत. यामुळे दबाव पोटावर येतो. तसेच हे आसन केल्यामुळे आपल्या कण्याला अपेक्षित ताण पडतो, त्यामुळे पाठीला होणाऱ्या वेदना कमी होण्यास मदत होते.

३. हॅमस्ट्रींग स्ट्रेच 

खाली झोपावं. कोणताही एक पाय गुडघ्यात दुमडावा. पण दुसरा पाय ताठ ठेवून गुडघ्याच्या मागच्या बाजूला दोन्ही हातांनी पकडून ठेवावा. कंबरेच्या वरचा भाग पूर्ण टेकवूनच ठेवावा. जो पाय हातांनी पकडून ठेवला आहे, त्याला पोटाकडे ओढावं. हळूहळू १५ ते २० अंक मोजावेत. त्यामुळे पोटऱ्यांवर व्यवस्थित ताण पडतो. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.