दिवसाची सुरुवात करा या ३ आरोग्यदायी पेयांनी…कॉफी – चहा नको नको….

चेहऱ्यावर मुरमे येणे, डाग पडणे, फोड येणे हे त्रास आता फक्त तारुण्याच्या उंबरठ्यावरच नाही नंतर ही होताना दिसतात. म्हणून नावाजलेल्या कंपन्यांची महागडी सौंदर्यप्रसाधने वापरून आपण आपल्या त्वचेला पुन्हा एकदा सुंदर बनवण्याच्या प्रयत्नात कायमच असतो. त्वचा बाहेरून भरपूर उपाय करतो. त्वचेची साफसफाई बाहेरून करण्यापेक्षा आतून साफसफाई केली तर भरपूर फरक पडतो. त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपल्याला उत्तम घागुती उपाय करता येतात. त्वचेला तजेलदारपणा पुन्हा मिळवता यावा म्हणू आरोग्यदायक पेये ही सकाळी प्यायली तर आरोग्याकरता हे फायदेशीर आहे.

आपण सकाळी उठून तोंड धुतलं की आधी चहा किंवा कॉफी पितो. काही जण तर बेड टीच घेतात. पण अनुशापोटी जर का ही औषधी पेये प्यायलो तर शरीरासाठी हे नक्कीच चांगलं आहे. सकाळी आपल्या पोटात थोडंसं आम्लाचं प्रमाण असतं. पचनही सावकाश होत असतं. ७ ते ८ तास आपण उपाशी असतो, म्हणून आपण आरोग्यासाठी पोषक असणारं काहीतरी सेवन करावं. म्हणून सकाळी उठल्यावर ही पेये प्यायली असता केस आणि त्वचेचं आरोग्य चांगलं राहील. घरीच  ही पेये अगदी सोप्या पद्धतीने बनवता येतात. आता टी पेये कोणती (Easy homemade drinks for better health) आणि त्यांच्या कृतीबद्दल जाणून घेऊया.

१. ग्रीन टी 

 सकाळी उठल्यानंतर वाफाळलेला चहा पिऊ नकात. त्यापेक्षा ग्रीन टी (Green Tea) प्या. ग्रीन तब्येतीसाठी चांगला आहे. यामध्ये असणारा पॉलीफेनॉल्स हा घटक आपल्या शरीरातील विषारी द्रव्ये (Toxins) काढण्यासाठी खूप उपयोगी आहेत.

२. लिंबू-मध पाणी 

सकाळी पाणी किंचित गरम करून त्यात मध घालून थोडासा लिंबाचा रस (Honey- Lemon – Hot Water) घालावा. आपल्या शरीरातील विषाक्त पदार्थ याच्या सेवनाने सहज बाहेर पडतात. त्वचेला जर कोणता संसर्ग झाला असेल तर लिंबाच्या रसाच्या सेवनाने हा संसर्ग कमी होऊ शकतो. सूजविरोधी आणि जंतुसंसर्ग विरोधी गुण हे मधातही आहेत. त्याचबरोबर त्वचेचा तेलकटपणा कमी करणे, त्वचेला तेजस्वी बनवणे हे फायदे माधामुळे होतात.

३. हळदीचं दूध

जंतुसंसर्ग होऊ नये म्हणून आपण जखमेवर हळद लावतो, हे तर सर्वांना माहित आहेच. हळदीमुळे त्वचा उजळते, याचीही कल्पना आहे. यात असलेल्या अँटीऑक्सिडंटसमुळे त्वचा लवकर सुरकुतली जात नाही. म्हणून हे हळद दूध (Turmeric in milk) त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. 


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole