हा कोर्स करा मोफत मिळेल लाखांच्या घरात पगार…

जग आता तंत्रज्ञानाच्या जोरावर प्रगती करत आहे. सध्याचा जमाना हा डिजीटलचा (Digital Era) आहे. सर्व गोष्टी करण्यावर जोर असतो. व्यवहार डिजिटल, व्यापार डिजिटल आणि व्यवसायही डिजिटल स्वरूपातच केला जातो. या डिजिटल व्यवसायाची जाहिरातबाजी ही याच डिजिटल माध्यमातून केली जाते. म्हणून डिजिटल माध्यमाचा वाढता वापर पाहता यामध्ये रोजगाराच्या संधीही वाढत आहेत. डिजिटल मार्केटिंग या क्षेत्राचं महत्व सध्या वाढत आहे. डिजीटल मार्केटिंग करता यावं यासाठी विविध कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्सेस खूपच खर्चिक आहेत. परंतु असा पण एक पर्याय आहे, जिथं कोर्स करून आपला फायदा होऊ शकतो. कसा काय? हा कोर्स करण्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज नाही. ही संधी आपल्याला गूगल ने उपलब्ध करून दिली आहे. गूगलच्या हा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स एकदम मोफत आहे व ऑनलाईन अगदी सहज करता येण्याजोगा आहे. 

गूगलच्या या कोर्समध्ये वेबसाईट ट्रॅफिक विश्लेषण, सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन, शोध जाहिराती कशा वापराव्यात? याबद्दलचे अनेक कोर्स करता येऊ शकतील. साधारण तीन ते चाळीस तास इतक्या वेळेमध्ये हा कोर्स पूर्ण करता येऊ शकेल. या कोर्समुळे तुमचा सीव्ही अधिक बळकट होईल.

१. डिजिटल मार्केटिंग चा बेसिक कोर्स

गूगल तर्फे घेतल्या जाणारा हा मूलभूत गोष्टी शिकवणारा डिजिटल मार्केटिंगचा कोर्स हा इंटरॲक्टीव्ह ॲडव्हर्टायझिंग ब्यूरोद्वारे मान्यताप्राप्त आहे. एकूण ४० तास असणाऱ्या या कोर्सच्या अभ्यासक्रमात प्रॅक्टीस सेशन ही आहेत.

२. गूगल डिस्प्ले सर्टिफिकेट कोर्स

या कोर्स मध्ये जाहिरात करण्यासाठी कशी आणि किती गुंतवणूक करायची याची माहिती आपल्याला मिळेल. गूगल डिस्प्ले च्या आधारे आपण शिकलेल्या गोष्टींचा सराव करू शकता. हा कोर्स गूगल स्किल शॉपवर उपलब्ध आहे. याचा अवधी अडीच तासांचा आहे.

३. गूगल ॲड सर्च सर्टिफिकेट कोर्स

गूगलच्या या ॲड सर्च कोर्समध्ये आपल्याला कीवर्ड आणि सर्च बद्दल शिकवलं जाईल. हा कोर्स ही साधारण अडीच तासांचा आहे.

४. गूगल ॲड ॲप सर्टिफिकेट कोर्स

हा कोर्स जाहिराती बनवण्याचा असेल हे तर केवळ नावावरूनच आपल्या लक्षात आलं असेल. हा कोर्स करुन डिजिटल जाहिराती बनवण्यात एकदम पटाईत व्हाल. हा कोर्स साधारण तीन तासांचा आहे. 

इतका मिळतो पगार

या डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात पगार चांगला मिळतो. वर्षाला पाचेक लाखांपर्यंत पगार मिळतो. आधी मोठया पगाराची अपेक्षा ठेवू नये. जसा अनुभव मिळेल तशी पगारात वाढ होते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.