भारतात क्रिप्टोकरन्सी वर बंदी नाही, RBI कडून स्पष्टीकरण

भारतात क्रिप्टोकरन्सी मध्ये (cryptocurrency) गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांची संख्या सुमारे 1 कोटीहून अधिक आहे. एका अंदाजानुसार, भारतातील गुंतवणूकदारांनी ‘क्रिप्टोकरन्सी’मध्ये 1.36 अब्ज डॅालर्स, म्हणजेच 10 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

काही दिवसांपूर्वी ‘एचडीएफसी’, ‘आयसीआयसीआय’, ‘एसबीआय’ यांसारख्या मोठ्या बॅंकांनी ‘क्रिप्टोकरन्सीं’द्वारे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांना सेवा न देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे (cryptocurrency) बाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

अखेर रिझर्व्ह बॅंकेनेच हा संभ्रम दूर केला आहे. रिझर्व्ह बॅंकेने क्रिप्टोकरन्सी (Reserve bank on cryptocurrency) बाबत 2018 मध्ये दिलेल्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने 2020 साली झालेल्या सुनावणीत अवैध ठरविल्या. त्यामुळे ‘क्रिप्टोकरन्सीं’द्वारे व्यवहारासाठी ‘आरबीआय’च्या 6 एप्रिल 2018 च्या सुचना आता लागू होत नाहीत.

देशातील मोठ्या बॅंकांनी 2018च्या सुचनांच्या आधारे ‘क्रिप्टोकरन्सीं’वर बंदी घालणे चुकीचे आहे. मात्र, ‘क्रिप्टोकरन्सीं’द्वारे होणाऱ्या व्यवहारासाठी ‘केवायसी’चे नियम, सावकारी कायदे, तसेच इतर नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचे पत्रक ‘आरबीआय’ने काढले आहे.

भारताचेही आभासी चलन येणार

‘आरबीआय’च्या स्पष्टीकरणामुळे (cryptocurrency)मधील गुंतवणूक सुरक्षित झालीय. मात्र, ग्राहकांना ही सुविधा द्यायची की नाही, याचा निर्णय घेण्यास बॅंका स्वतंत्र असल्याचेही ‘आरबीआय’ने स्पष्ट केले आहे. दरम्यान, लवकरच भारताचेही एक आभासी चलन (क्रिप्टोकरन्सी) उपलब्ध होणार आहे. त्यासाठी तांत्रिक व अन्य गोष्टींवर ‘आरबीआय’ काम करीत असल्याचे समजते.


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole