बारावीनंतर कॉमर्समध्ये करिअर करायचंय? मग हे कोर्सेस करा आणि मिळवा भरपूर पगार

बारावीनंतर कॉमर्समध्ये करिअर करायचंय? मग ह्या commerce career options मधील कोर्सेस करा आणि मिळवा भरपूर पगार

पालक आपल्या मुलांच्या पालनपोषणासाठी खूप कष्ट घेतात. मुलांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी ते मुलांच्या  लहानपणापासूनच जागरूक असतात. त्यांना  फी भरून मोठ्या व महागड्या शाळेत घातलं जातं. क्लासेस लावले जातात. दहावीत मुलांनी चांगले गुण मिळवावेत, विज्ञान (Science) शाखेत प्रवेश घ्यावा, बारावीलाही उत्तम मार्क मिळवून डॉक्टर किंवा इंजिनियर होऊन मोठ्या कंपनीमध्ये नोकरी मिळवावी किंवा परदेशात जावे व आपले भविष्य उज्ज्वल करावे, अशी बहुतेक पालकांची इच्छा असते. पण आपल्याकडे लोकांना वाटतं की विज्ञान शाखेत गेल्यावरच करियर घडतं, उत्तम नोकरी लागते. पण खरंच असं आहे का? अजून कोणत्या शाखा आहेत? विज्ञान शाखेव्यतिरिक्त कुठल्या शाखेत गेल्यावर करिअर घडू शकतं? जाणून घेऊयात


दहावी नंतर पुढच्या शिक्षणासाठी विज्ञान शाखा हाच पहिला पर्याय असतो. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळतात त्यांना नाईलाजाने दुसरे पर्याय निवडावे लागतात. यानंतर वाणिज्य शाखेचा (commerce career options) नंबर सगळ्यात वर लागतो. या शाखेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही भरपूर आहे. विज्ञान शाखेच्या बाबतीत जो गैरसमज सांगितला तसाच या शाखेबद्दलही आहे की Commerce मध्ये गेल्यावर केवळ chartered accountant शिवाय दुसरा काहीच मार्ग नाही. पण commerce मधील वेगवेगळ्या पदव्या आहेत. त्याचबरोबर career चे वेगवेगळे मार्ग आहेत.

commerce career options in Marathi –

ग्रॅज्युएशन कोर्सेस

 • बीकॉम (ऑनर्स) (B.Com) (Hons.)
 • अर्थशास्त्रात बीए (ऑनर्स) (BA (Hons.) in Economics)
 • बी.कॉम- बॅचलर ऑफ कॉमर्स (B.Com)
 • बीबीए- बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (BBA)
 • इंटिग्रेटेड लॉ प्रोग्राम- बी.कॉम एल.एल.बी. (B.Com LL.B.)
 • इंटिग्रेटेड लॉ प्रोग्राम – बीबीए एलएल.बी (BBA LL.B)

प्रोफेशनल कोर्सेस

याचबरोबर कॉमर्स घेऊन अजून काही प्रोफेशनल कोर्सेस
(Professional courses) करता येतात. हे कोर्सेस खालीलप्रमाणे आहेत.

 • सीए- चार्टर्ड अकाउंटन्सी (CA)
 • सीएस- कंपनी सेक्रेटरी (CS)
 • बॅचलर इन फॉरेन लँग्वेज (Bachelor in Foreign Language)
 • डिझाईन कोर्सेस (Design Courses).

असे पर्याय उपलब्ध आहेत, या माहितीचा तुम्हा वाचकांना, तुमच्या जवळच्यांना करियर घडवण्यासाठी नक्कीच फायदा होईल.


1 Comment
 1. Snehal Verulkar says

  At Post Murtijapur (Taroda) Tq Tiosa Dist Amravati Pin Code 444709

Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Do not Copy.