पुण्यात 12वी पाससाठी नोकरीची संधी.. सीमा रस्ते संघटनेमार्फत 876 पदांसाठी भरती

BRO Recruitment 2022

BRO Recruitment 2022 : नोकरी शोधात असलेल्या तरुणांसाठी मोठी संधी चालून आलीय. सीमा रस्ते संघटना पुणे(Border Roads Organisation General Reserve Engineer Force) येथे भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना (BRO Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2022 असणार आहे.

एकूण जागा : ८७६

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) स्टोअर कीपर टेक्निकल (Store Keeper Technical)- 377 पदे
शैक्षणिक पात्रता (Qualification
) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

२) मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक (Multi Skilled Worker) – 499 पदे
शैक्षणिक पात्रता (Qualification
) : या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Passed Class 2 course for Driver Plant and Mechanical Transport पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयोमर्यादा :
स्टोअर कीपर टेक्निकल – १८ ते २५ वर्षे
मल्टी स्किल्ड कामगार ड्रायव्हर इंजिन स्टॅटिक – 18 ते 27 वर्षे

निवड प्रक्रिया
या भरती अंतर्गत निवड प्रक्रिया पुढील टप्प्यातील उमेदवाराच्या कामगिरीच्या आधारे केली जाईल. उमेदवारांना आवश्यक टप्प्यात पात्रता प्राप्त करावी लागेल. भरतीच्या निवड प्रक्रियेमध्ये चार टप्पे आहेत:

लेखी परीक्षा – उमेदवारांची निवड केवळ लेखी परीक्षेतील तात्पुरत्या गुणवत्ता यादीच्या आधारे केली जाईल आणि उमेदवारांना शारीरिक आणि व्यावहारिक व्यापार चाचणीसाठी लेखी गुणांच्या आधारे पुढील भरती प्रक्रियेसाठी बोलावले जाईल.
शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET/PST)
दस्तऐवज सत्यापन
वैद्यकीय तपासणी

पगार
मल्टी स्किल्ड कामगार – 7 व्या CPC पे मॅट्रिक्समध्ये वेतन स्तर 2 नुसार 19900-63200 रुपये
स्टोअर कीपर टेक्निकल – 7 व्या CPC वेतन स्तर 1 नुसार पे मॅट्रिक्समध्ये रु. 18000-56900

अर्ज करण्यासाठीचा पत्ता : मांडंट, जीआरईएफ सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015.
अधिकृत संकेतस्थळ : http://bro.gov.in/
जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा


Leave A Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

Optimized by Optimole